Rupali Chakankar Resignation : 'रुपाली चाकणकरांचा राजीनामा नाही...', सुषमा अंधारेंनी एका वाक्यात विषय संपवला!

Sushma Andhare On Rupali Chakankar Resignation : रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला आहे. या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
sushma andhare, rupali chakanakar
sushma andhare, rupali chakanakar sarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगापाठोपाठ राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. अशोक खरात प्रकरण उजेडात आल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

अंधारेंनी नाशिकला जात पोलिस आयुक्तांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या पतीने कसा आर्थिक फायदा करून घेतला, हे देखील सांगितले. दरम्यान, शुक्रवारी रात्री चाकणकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत'हा राजीनामा नाही; गच्छंती आहे...!', अशी पोस्ट करत चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी झाल्याचे अप्रत्यक्ष म्हटले आहे.

sushma andhare, rupali chakanakar
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

अटकेची टांगती तलवार

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी आपली बदनामी करणाऱ्यांना अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याचे म्हटले होते. त्यांचा अप्रत्यक्ष इशारा हा सुषमा अंधारे यांच्याकडे होता. दरम्यान, त्याला प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या होत्या की, 'चाकणकरबाई, डायलॉग बाजी करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्यावर जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा आधी विचार करा.'

रुपाली पाटील काय म्हणाल्या?

“भोंदूबाबा खरात याने शोषण केलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी खरातची दलाली करणाऱ्या ‘डर्टीवुमन’ची आज पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पीडित महिलांच्या न्यायासाठी पक्ष आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून माझ्यासोबत एकत्रितपणे लढा देणाऱ्या प्रा. सुषमा ताई अंधारे, अंजली ताई दमानिया, संगीताताई तिवारी, आशाताई मिरगे, मनीषाताई कवेडिया यांचे मनःपूर्वक आभार.जेव्हा जेव्हा न्याय होईल…! तेव्हा अजित दादांची आठवण येईल!!”

sushma andhare, rupali chakanakar
Rupali Chakankar Resignation : 'नीच,नीच वृत्तीची बाई..',चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली पाटलांनी 'तो' फोटो दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com