Nitin Gadkari: ...तर पुढच्या आठवड्यातच नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाच्या भूमीपूजनाला येतो; गडकरींचं सुनेत्रा पवारांना आश्वासन

नाशिक फाटा ते खेड या उन्नत महामार्गासाठी ८ हजार कोटींची डीपीआर तयार आहे. मात्र काही अधिकाऱ्यांनी फाईल्स रखडवून ठेवल्या आहेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama
Published on
Updated on

पुणे - नाशिक फाटा ते खेड या उन्नत महामार्गासाठी ८ हजार कोटींची डीपीआर तयार आहे. मात्र काही अधिकाऱ्यांना फाईल्स रखडवून ठेवण्याची सवयच झाली आहे. एका अधिकाऱ्याने १०० टक्के भूसंपादन होत नाही तोपर्यंत निधी न देण्याचा पवित्रा घेतला, त्यामुळं या कामाची निविदा रखडली आहे. १०० टक्के भूसंपादन करा पुढच्या आठवड्यात भूसंपादनाला येतो, असं आश्‍वासन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिला. दरम्यान, पुढच्या आठवड्यात भूसंपादन पूर्ण करण्यासाठी १५० कोटी देतो असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्यावर, नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Nitin Gadkari
TMC MP: तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांचा अखेर लागला निकाल; लोकसभा अध्यक्षांनी दिला 'हा' आदेश

नाशिक फाटा-खेड उन्नत मार्गाच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावर गडकरी म्हणाले, ‘‘या रस्त्यासाठी ९० कोटींचं भूसंपादन शिल्लक आहे. हे संपादन पूर्ण करा पुढच्या आठवड्यात भूमीपूजनाला पुन्हा येतो. तर काही बांबूनी १०० टक्के भूसंपादन होत नाही तोपर्यंत या कामाला मंजुरी देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळं काम रखडल्याचे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उन्नर महामार्गांच्या भूमीपूजन प्रसंगी गडकरी शनिवारी (ता.१८) बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपूरे, राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, आमदार खासदार यावेळी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Kumar Saptarshi: युक्रांदचे संस्थापक, समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन

दीर्घकाळ रखडलेल्या महामार्गांच्या कामांबाबत बोलताना, काही महामार्ग शाप असल्यासारखे मला मिळाले असं धक्कादायक विधान गडकरी यांनी केलं. यामध्ये पुणे-सातारा आणि मुंबई-गोवा महामार्ग यांचा समावेश आहे. मात्र, या महामार्गाच्या कामाला गती देऊन पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com