Election Commission of India : गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छूकांचा हिरमोड, निवडणूक आयोगाचा 'हा' मोठा खुलासा

State Government : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा वर्ष झाले महापालिकेची निवडणूक रखडलेली असून तेथे सध्या प्रशासकांचा कारभार सुरु आहे.
Election Commission Latest News
Election Commission Latest Newssarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad : राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२३ पर्यंतच्या विधानसभेच्या मतदार याद्या या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वापरण्यात येथील अशी अधिसूचना गुरुवारी (दि..५) काढली. त्यामुळे लांबलेल्या या निवडणुका होणार असल्याचे समजून त्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले इच्छूक आनंदले होते. पण, त्यांचा आज हिरमोड झाला.

राज्य निवडणूक आयोगा(Election Commission of India) ने काढलेल्या अधिसुचनेतून झालेला गैरसमज आयोगाने शुक्रवारी (दि.७) स्पष्टीकरण देऊन दूर केला. स्थानिक स्वराज्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीला जैसे थे चा आदेश दिलेला असल्याचे सांगत त्या घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सूचित केले. त्यामुळे त्यातही महापालिका निवडणुकीसाठीच्या इच्छूकांचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण त्यांनी मोठी तयारी यापूर्वीच सुरु केली होती.

Election Commission Latest News
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये? निवडणूक आयोगाचे संकेत!

पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या काहींनी,तर संपर्क कार्यालयेही थाटली होती. मात्र, निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ती त्यांना बंद करावी लागली होती.पुणे,पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा वर्ष झाले महापालिकेची निवडणूक(Election) रखडलेली असून तेथे सध्या प्रशासकांचा कारभार सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केला.

Election Commission Latest News
Manisha Kayande On Sushma Andhare : नकली हिंदुत्ववाले ठाकरे गटाचा चेहरा; मनिषा कायंदेंचा अंधारेंवर निशाणा

मदान म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदारयाद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या या याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. या आगामी संभाव्य सार्वत्रिक निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर त्यासाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी ती निश्चित केली जाते. त्यासंदर्भात अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीही त्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच त्या म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. त्यात नमूद कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही मदान यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.