Chandrakant Patil : 'ठाकरे-शिंदेंनी एकत्र येऊन, खोके वगैरे थांबवलं पाहिजे'; मी पुढाकार घ्यायला तयार : पाटलांची भूमिका!

Chandrakant Patil ON Thackeray Shinde Thackeray Clash : चिखलफेकीत आता सामान्यांना रस राहिलेला नाही.
Chandrakant Patil : Uddhav Thackeray : Eknath Shinde
Chandrakant Patil : Uddhav Thackeray : Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

प्राची कुलकर्णी :

Chandrakant Patil On Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण झाली आहे. शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या महत्त्वाच्या प्रकरणावर निकाल राखून ठेवला आहे. याबाबतचा निर्णय लवकरच येणे अपेक्षित आहे. मात्र यावरून शिंदे - ठाकरे गटात निकालाआधीच वेगवेगळे दावे होत असताना, भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Patil : Uddhav Thackeray : Eknath Shinde
Phaltan Market Committee : राजेगटासमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान; खासदार निंबाळकर यांची सावध भूमिका

चंद्रकांत पाटील यांची साम वाहिनीने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी ठाकरे व शिंदे गटातील संघर्षावरही मत व्यक्त केले. 'ठाकरे आणि शिंदे यांनी आपसातले मतभेद सोडून एकत्र आलं पाहिजे, असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. '

"राजकारणात दररोज चिखलफेक होत आहे. दररोज जी चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीत आता सामान्यांना रस राहिलेला नाही. समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन आत्ता जे खोके वगैरे सुरू आहे, ते थांबवलं पाहिजे. मला कोणी याबाबत सांगितलं तर मी यात पुढाकार घेईन," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil : Uddhav Thackeray : Eknath Shinde
Chandrakant Patil : महापालिका निवडणुकांबाबत चंद्रकांतदादांचे मोठे विधान; म्हणाले...

पाटील पुढे म्हणाले, "आगामी निवडणूक ही शिंदे गट एकनाथ शिंदेंच्या आणि भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढेल. मात्र जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वी अनेक गोष्टी बदलणार आहेत. अनेक विरोधी पक्षातले लोक पक्षात येतील आणि मग त्यांना तिकीट कोणाकडून द्यायचं हा प्रश्न निर्माण होईल अस, मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com