Pune scam case: अमेरिकेतील लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होताच, पुण्यातील आमदारांनी घातले मुख्यमंत्र्यांकडे 'हे' महत्त्वाचे साकडे

US scam gang busted News : सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, शहरात असलेले एकमेव सायबर पोलीस ठाणे हे अपुरे पडत आहे
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील खराडी परिसरातील एका कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अरेंज करून मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील लोकांबरोबरच देशातील देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉडला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे एक विशेष मागणी केली आहे.

सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, शहरात असलेले एकमेव सायबर पोलीस ठाणे हे अपुरे पडत आहे. त्यामुळे शहरातील पाचही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे, अशी मागणी रासने यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) यांना पत्र लिहून केली आहे.

Devendra Fadnavis
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: एकत्र येणे, हा उद्धव-राज ठाकरेंसमोरील अखेरचा पर्याय

पुण्यातून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”च्या बनावट धमक्या देत गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.

Devendra Fadnavis
Thackeray brothers reunion : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार की नाही? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत, थेटच म्हणाले, 'पडदा...'

सध्या सायबर गुन्हेगारीची आकडेवारी पाहिल्यास सन 2022 मध्ये 10 हजार 692 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, 2023 मध्ये ही संख्या 11 हजार 974 होती तर 2024 मध्ये तब्बल 12,954 गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच अर्थ सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी केवळ 6,204 (2022), 7,069 (2023) आणि 1,739 (2024) गुन्ह्यांचाच न्यायालयीन निकाल लागलेला असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याचे रासन यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यामुळे या सर्व केसेसचा तातडीने निपटारा होण्याचं आवश्यक असल्याने अतिरिक्त कुमक आवश्यक असल्याचं रासने यांनी नमूद केले आहे.

Devendra Fadnavis
Satara Politic's : फडणवीसांची साताऱ्यात मोठी खेळी; अजितदादांना ‘कात्रज’चा घाट दाखवत एकनाथ शिंदेंना घातली वेसन!

त्यासाठी पुण्यातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक अशी पाच सायबर पोलीस ठाणी स्थापन केल्यास सायबर गुन्ह्यांची जलद आणि तांत्रिक तपासणी शक्य होईल. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, ई-ऑफिस प्रणालीद्वारे सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करावे, प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करावी अशा मागण्याही रासने यांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.

Devendra Fadnavis
Maharshtra Assembly Election: धाकधूक वाढली; अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 'या' दहा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com