Amit Thackeray : पहिल्या राजकीय गुन्ह्याची वाट बघतोय, विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'पुण्यातून...'

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध प्रश्नांबाबत मोर्चा काढत कुलगुरूंशी केली चर्चा.
Amit Thackeray
Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करावी, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी, यांसह अनेक मागण्यांकरता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी चतुःशृंगी मंदिरापासून विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. या शिष्टमंडळामध्ये अमित ठाकरे यांच्या समवेत शर्मिला ठाकरे तसेच मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील होते. यानंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर प्रशासनाचे डोळे आणि कान उघडण्यासाठी हे आंदोलन होतं.

Amit Thackeray
Jalna News : धक्कादायक! अंतरवालीतील त्या दगडफेकीबाबत जरांगेंचे सहकारी वाळेकर यांचा गंभीर आरोप...

पुणे विद्यापीठ हे 1949 पासून अस्तित्वात असून, त्यावेळीपासून आतापर्यंत जर मेसच्या जेवणाबाबत आपण भांडत असेल, तर ही शोकांतिका आहे. विद्यापीठाच्या जेवणामध्ये झुरळ, दगड मिळून येत आहेत. कॅन्टिनची आणि वसतिगृहातील बाथरूमची दुरवस्था झालेली आहे. याबाबतचे फोटो आम्ही कुलगुरूंना दाखविले असून, अनेक विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाही. बाजूच्या मठातून आलेला प्रसाद खाऊन हे विद्यार्थी गुजराण करत आहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नाशिक आणि नगर येथे नवीन इमारती तयार आहेत. पण मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणून उद्घाटन होत नाही. त्यामुळे तीन ते चार तासांचा प्रवास करून विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये त्यांची कागदपत्रे घेण्यासाठी यावं लागत आहे. मराठी भाषा भवनाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. या ठिकाणी असलेले वसतिगृह अत्यंत तोकडे असल्याने आणखी 10 हजार विद्यार्थी राहतील एवढं वसतिगृहं उभारण्याची मागणी आम्ही केली असून, विद्यापीठ प्रशासन त्याच्यावरती कार्यवाही सुरू करणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. विद्यापीठाला एक आठवड्याचा अवधी दिला आहे.

या वेळेत जर कार्यवाही झाली नाही तर बारावीच्या परीक्षांमुळे आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले आहे. एका आठवड्यानंतर जर विद्यापीठाचे उत्तर आले नाही तर आमचे उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असं म्हणत मी माझ्या पहिल्या राजकीय गुन्ह्याची वाट बघत असून, तो पुण्यातून दाखल झाल्यास मला आनंद होईल, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.

पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले, हा गंभीर मुद्दा आहे. 4 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आई - वडिलांनी आणि आजी - आजोबांनी या सरकारला निवडून दिलं त्या विद्यार्थ्यांना या सरकारने वाऱ्यावरती सोडले आहे. त्यामुळे मनसे विविध शहरांमध्ये 'अवेअरनेस कॅम्प' सुरू करणार आहे. एका शहरात एवढे ड्रग्ज सापडले आहेत, तर त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्री कुठेतरी कमी पडत असल्याची टीका अमित ठाकरे यांनी केली.

पुणे लोकसभा निवडणूक लढण्याबाबत अमित ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले, मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मात्र, राज साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली तर मी यशस्वीपणे पार पाडेल. ते म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक आणि सरपंचही होईल. पुण्यातून ही लोकसभा लढवेल, पण माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

R

Amit Thackeray
Bengal Sandeshkhali News : मोदींच्या बंगाल दौऱ्याआधीच ममतांनी पलटवला डाव; भाजप नेत्याला 'सेक्स रॅकेट'मध्ये अटक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com