Cabinet Expansion : मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुण्यातून कुणाला संधी मिळणार? ; 'ही' नावं आघाडीवर !

Maharashtra Government Cabinet Expansion : महाराष्ट्राला राज्य सरकारातील पहिल्या महिला मंत्री मिळणार?
Cabinet Expansion :
Cabinet Expansion :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११ मे) लागला. न्यायालयाच्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला मिळाले. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार तूर्तास तरी बचावले आहे. दरम्यान, मागील बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागल्याची चर्चा आहे. (Maharashtra Government Cabinet Expansion)

गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार २३ किंवा २४ मे रोजी होण्याची चर्चा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये सुरु आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी सत्तेतील शिवसेनेसह भाजप आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांनी 'फिल्डिंग' लावली आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Cabinet Expansion :
BJP State Executive Meeting: निवडणुकांच्या तोंडावर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची होणार चांदी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास २० नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येईल अशी चर्चा आहे. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून काही नावे चर्चेत आली आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता लक्षात घेऊन आता पुणे जिल्ह्यातूनही मंत्रिपदासाठी काही नावे पुढे येत आहेत. यामुळे आता पुण्यातून कुणाला संधी मिळणार? याची चर्चा होत आहे.

Cabinet Expansion :
Pune DPC Meeting : भाजप-शिंदे गटाला किती निधी द्यायचा ते तुम्ही ठरवा; पण आमच्याही निधीचे नियोजन करा : अजितदादांसह विरोधी आमदार आक्रमक

महेश लांडगे, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत -

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge), दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) आणि पुणे शहरातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

आमदार राहुल कुल हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. २०१४ मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या, तर २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पिंपरी चिंचवड शहराला किमान एका मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी वारंवार मागणी होत आली आहे. यामुळे महेश लांडगे हे ही मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. तर पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पुण्यातील एकमेव महिला आमदार माधुरी मिसाळ यांची ही दावेदारी प्रबळ मानली जाते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नसल्याने मिसाळ यांचा समावेश होऊ शकतो, याची शक्यता अधिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com