Women Commission : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'आयात' महिला नेत्याची वर्णी? राष्ट्रवादीतील निष्ठावंतांचा पत्ता कट होणार!

NCP loyalists upset over women commission appointment: महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू इच्छिनाऱ्या महिलेची वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजी आहे.
Maharashtra Women Commission Post Sparks NCP Controversy Over Leader Selection
Maharashtra Women Commission Post Sparks NCP Controversy Over Leader SelectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra women commission political controversy: भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकार यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महत्त्वाचे पद सध्या रिक्त आहे. महायुतीच्या सत्तावाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून, सध्या या पदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या पदासाठी एखाद्या 'आयात' महिला नेत्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात असल्याने पक्षातीलच निष्ठावंत इच्छुकांचा मोठा अपेक्षाभंग होण्याची चिन्हे आहेत.

या पदासाठी आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे, मीरा बोरवणकर आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आता या शर्यतीत अचानक शायना एनसी यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सध्या शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. या भेटीनंतर शायना एनसी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची आणि त्यांनाच महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी आणि आयोगासाठी वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांचीही नावे चर्चेत आहेत, मात्र 'आयात' नावाच्या चर्चेमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे.

शायना एनसी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत मुंबादेवी मतदारसंघातून नशीब आजमावले होते, मात्र काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवानंतर शायना एनसी राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठीही मोठे प्रयत्न केले होते, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही.

Maharashtra Women Commission Post Sparks NCP Controversy Over Leader Selection
NCP News : सुनेत्रा पवारांच्या जागी 'राज्यसभेसाठी' 4 माजी खासदारांची फिल्डिंग : दोनदा माघार घेतलेल्या भुजबळांचे नाव पुन्हा आघाडीवर

सुनेत्रा पवार घेणार निर्णय

विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने शायना एनसी नाराज असल्याची चर्चा होती. आता महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन होणार का आणि राष्ट्रवादीतील इतर इच्छुकांना डावलले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Women Commission Post Sparks NCP Controversy Over Leader Selection
NCP Rajyasabha seat : सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेवर कोण जाणार? 'ही' 5 नावे आघाडीवर, चाकणकरांच्या पदाचाही निर्णय होण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com