Chinchwad By-Election : तुम्ही तर जगतापांच्या भावकीत, त्यांना कशी लढत देणार? अजितदादांच्या प्रश्नावर इच्छुक म्हणाला...

Ajit Pawar : अजितदादांनी अनेक मुलाखती घेतल्यानंतर काय म्हणाले, इच्छुक उमेदवार?
Chinchwad By-Election : Ajit Pawar :
Chinchwad By-Election : Ajit Pawar :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chinchwad By-Election : राष्ट्रवादी कँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल चिंचवड पोट-निवडणुकीसाठी पक्षातील इच्छुकांच्या आपल्या स्टाईलने मुलाखती घेतल्या.त्यातून त्यांना या शहराचीच नाही,तर आपले नेते,पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही खडानखडा माहिती त्यांना कशी आहे,याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

दरम्यान, इच्छुक उमेदवारांमध्ये चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी भावकी असलेले राजेंद्र जगताप यांचीही मुलाखत अजित पवार यांनी घेतली. मुलाखत घेताना अजित पवार हे राजेंद्र जगतापांना म्हणाले की, "तुम्ही लक्ष्मण जगतांपांच्या भावकीतले, मग भाजपच्या जगतापांना कशी लढत देणार? कशी तयारी आहे तुमची? असा थेट प्रश्न अजित पवारांनी राजेंद्र जगतापांना केला.

Chinchwad By-Election : Ajit Pawar :
Kasaba By-Election : कसब्याच्या रंणागणांत बिचुकलेंची एन्ट्री; बिचुकलेंच्या पत्नीने अर्ज नेला

या प्रश्नावर उत्तर देताना जगताप म्हणाले की, आमची भावकी असली तरी, भावकीला नाही तर पक्षाला महत्व देतो व देणार, असे उत्तर राजेंद्र जगताप यांनी दिले. मुलाखत झालेल्यांमध्ये अनेक इच्छुक उमेदवारही होते. यावेळी, नाना काटे, माया बारणे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, अॅड. गोरक्ष लोखंडे यांनीही ही मुलाखत दिली.

Chinchwad By-Election : Ajit Pawar :
Amravati Graduate : मतमोजणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू..

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. तेथून राष्ट्रवादी काँग्रेससकडून ११ इच्छूक आहेत. त्यांच्या मुलाखती अजितदादांनी काल पुण्यात घेतल्या. यामध्ये त्यांचा मन, मत व तयारीही त्यांनी जाणून घेतली.

तसेच, ही जागा लढणार असल्याने तयारीला लागण्याचा आदेश त्यांनी दिला. या निवडणुकीत ज्यांच्या प्रभागात कमी मते पक्षाला पडतील त्यांना आगामी पालिका निवडणुकीत संधी देणार नसल्याचा सज्जड इशाराही अजितदादांनी यावेळी अजितपवारांनी आपल्या स्टाईलमध्ये दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com