Ajit Pawar News: अजित पवार राष्ट्रवादीकडून नव्हे तर या पद्धतीने मुख्यमंत्री बनतील; माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar CM News: मी त्यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. कारण, त्यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा आहे. चिटिंग नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar CM News : जिथे जिथे सुशिक्षित समाज आहे, त्या ठिकाणी पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्यांची ती स्वप्नं आहेत. त्यांच्यातील सगळ्या लोकांनी भावी भावी लावावं. आता अजित पवार यांच्याबद्दल बोलत असाल, तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होणार नाहीत. इकडे तिकडे कुठे गेले, तरच ते मुख्यमंत्री बनतील, असा गौप्यस्फोट माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला. (Ajit Pawar will not become Chief Minister from NCP : Vijay Shivtare)

विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले की, शरद पवार यांना ५० ते ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यांनी कितीही प्रयत्न करूद्यात. महाराष्ट्रातील पाच-सहा जिल्ह्यातील लोकांचा, तेसुद्धा त्यांच्या हातात संपूर्ण फायन्सास आहे. जिल्हा बॅंका, साखर कारखाने, दूध संघ, डेअऱ्या आहेत. शेतकऱ्यांना नागवून, पायाखाली ठेवले आहे, त्यातून त्यांना ६० पर्यंत आमदार मिळतात. मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, बिजू पटनाईक यांना त्यांच्या राज्याने संपूर्ण सत्ता दिली. पण, शरद पवारांना कधीही महाराष्ट्राने संपूर्ण सत्ता दिलेली नाही आणि देणारही नाही.

Ajit Pawar
Bhagirath Bhalke News : राष्ट्रवादीला मोठा हादरा : भगीरथ भालके ‘केसीआर’च्या भेटीला; भालकेंसाठी खास विमान पाठविले

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचाराचे आमदार तर सोडाच पण नगरसेवकही मिळत नाहीत. त्यांची ती मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं आहेत. भावी भावी सगळ्यांनी लावावं. आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल बोलत असाल तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मुख्यमंत्री होणार नाहीत. इकडे तिकडे कुठे गेले तर मुख्यमंत्री बनतील. मी त्यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. कारण, त्यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा आहे. चिटिंग नाही. त्यांनी कितीही आपण राष्ट्रवादीतच असल्याचे सांगितलं तरी आतील तडफडी आम्ही पाहतो आहोत, असेही शिवतारे यांनी नमूद केले.

Ajit Pawar
Mangalveda Politics: पीए बदलून भालकेंची माणसं फुटायची नाहीत; गड्या तुला ते जमणार नाही, भगीरथ भालकेंचा आमदार आवताडेंना टोला

विजय शिवातारे म्हणाले की, उद्धव ठाकरे आता जे पाप करत आहेत, त्यामुळे त्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. सर्वाधिक फायदा कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना साहेब साहेब करून सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. उद्धव ठाकरे यांना एवढं साधं गणित कळत नाही की, भाजपचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ हा सगळा विचार केला तर भाजपसमोर हरलेलं कोण आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यामुळे दोन नंबरच्या जागा म्हणून त्या दोन्ही काँग्रेसकडे जाणार आहेत.

Ajit Pawar
Sugar Factory Election :कल्याणराव काळेंची विजयी सलामी; पण सामना अटीतटीचाच, अभिजीत पाटलांच्या पॅनेलचे कडवे आव्हान

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील बाळासाहेबांचे कट्टर अनुयायी यांना मिसगाईड करून कदाचित इतक्या प्रकारचे वाईट काम त्यांच्या हातून घडेल की, काळ्या अक्षरांनी त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात लिहिले जाईल, असेही शिवतारे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com