Income Tax Raid : अजितदादांचे निकटवर्तीय पुन्हा इनकम टॅक्सच्या रडारवर; पण,‘त्या’ भूमिकेचीही चर्चा!

Ajit Pawar's Close Associates : अजित पवार यांच्या या निकटवर्तीयांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे तर ही कारवाई होत नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे.
Sanjeevraje Naik Nimbalkar-Ajit Pawar
Sanjeevraje Naik Nimbalkar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 06 February : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान थंडावलेली इनकम टॅक्स विभागाची छापेमारी राज्यात पुन्हा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका संपून महायुतीचे सरकार सत्तेवर येताच आयटी डिपार्टमेंट राज्यात पुन्हा सक्रीय झाले आहे. पण नव्या मोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय टार्गेट असल्याचे मागील दोन दिवसांच्या कारवाईनंतर दिसून येत आहे. मात्र, अजित पवार यांच्या या निकटवर्तीयांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे तर ही कारवाई होत नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे. इनकम टॅक्सची छापेमारी नियमित असल्याचे कितीही सांगितले तरी त्याला राजकीय वास असतोच, हे मागील काही वर्षांत प्रकर्षाने पुढे आले आहे.

मागील पंचवर्षिकमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स (Income Tax) विभागाची छापेमारी जोरदारपणे सुरू होती. त्यात विशेषतः विरोधी पक्षातील नेते रडावर होते. या सर्व संस्था ह्या केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात, त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षावर विरोधी पक्षाकडून आरोप होत होते.

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार सत्तेवर येताच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला काही प्रमाणात ब्रेक बसला हेाता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्या संपूर्णपणे थंडावल्याचे दिसून येत होते. मात्र, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. त्यानंतर मात्र महाराष्ट्रात इनकम टॅक्स विभागाची कारवाई सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीयांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि इंदापूरमधील नेचर डिलाईट या डेअरीचे अर्जून देसाई यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे.

Sanjeevraje Naik Nimbalkar-Ajit Pawar
Beed Crime : एवढी मोठी डेअरिंग! आधी लाथाबुक्क्या, रॉडने तरुणाला मार मार मारलं, नंतर 'वाँटेड' आरोपी कृष्णा आंधळेचा ठेवला स्टेटस

विधानसभा निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांनी काहींशी अलिप्तवादी भूमिका घेतली होती. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येताच रामराजेंनी राष्ट्रवादीच्या बैठकांना पुन्हा हजेरी लावली होती. त्यानंतर संजीवराजे हेही पुन्हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच संजीवराजे यांच्या फलटण आणि पुण्यातील घरांवर छापेमारी करण्यात आलेली आहे.

या छापेमारीसंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. घरासमोर गर्दी करू नका, प्राप्तीकर विभागाला त्यांचे काम करू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने ही कारवाई केली जात आहे, अशी चर्चा या कारवाईनंतर रंगली आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील कळस येथील उद्योजक अर्जून देसाई यांच्या ‘नेचर डिलाईट’ या डेअरीवरही छापेमारी करण्यात आली आहे. देसाई यांच्या घरी तब्बल २५ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. देसाई यांचे जावई आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका नातेवाईकाकडेही चौकशी करण्या आल्याची माहिती आहे.

कळस येथील नेचर डेअरीचे अर्जून देसाई हे अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, विधानसभा निवडणुकीत देसाई यांनी शरद पवर यांच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा आहे. त्यातूनही हा प्रकार झाला असावा का, अशीही चर्चा रंगली आहे. पण, देसाई हे अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

Sanjeevraje Naik Nimbalkar-Ajit Pawar
Sanjay Raut : 'ते राजे आहेत, बोलण्यापेक्षा त्यांनी थेट पूर्तता करावी'; संजय राऊतांचा उदयनराजेंना टोला

फलटणचे नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पवारांची साथ आतापर्यंत सोडलेली नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजितदादांसोबत जाणे पसंत केले होते. मात्र, लोकसभा आणि विधानसभेला त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबत जाणे पसंत केले हेाते. मात्र, विधानसभा निकालानंतर त्यांनी पुन्हा अजित पवारांशी जवळीक वाढवली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. तत्पूर्वीच ही कारवाई झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com