BJP's Mission Kerala : भाजपचं आता ‘मिशन केरळ’: विनोद तावडेंच्या मदतीला महाराष्ट्रातील आमदार, नेत्यांची टीम...

BJP Team On Kerala Tour : भाजपने केरळवर लक्ष केंद्रीत केले. विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी, शोभा करंदलाजे सहप्रभारी. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी मोहिमेत सहभागी. राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक हालचालींमुळे राजकीय चर्चांना वेग.
BJP Team
BJP TeamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 February : बाराही महिने ‘इलेक्शन मोड’वर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता आपले लक्ष केरळवर केंद्रीत केले आहे. केरळच्या सत्तारोहणाची जबाबदारी भाजपचे सरचिटणीस आणि राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतीला सहप्रभारी म्हणून कर्नाटकातील केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोलापुरात भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण करण्यात महत्वाची भूमिका निभावलेले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही केरळच्या विजयी मोहिमेचे प्रमुख शिलेदार असणार आहेत.

केरळ (Kerala) विधानसभेच्या १४० मतदारसंघाची निवडणूक या वर्षात होणार आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपकडून निवडणूक पूर्व रणनीती आखली जात आहे. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जानेवारीमध्ये रणशिंंग फुंकले आहे, त्याचा पुढचा टप्पा म्हणून मतदारसंघनिहाय प्रभारी नेमण्याची प्रक्रिया भाजपकडून सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही नेत्यांना केरळच्या मोहिमेवर पाठविण्यात आलेले आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत महाराष्ट्रातून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार मनोज कोटक, प्रवीण दटके, रणजित पाटील, प्रताप अडसड यांच्यासह इतर काही नेते केरळच्या दौऱ्यावर गेले आहेत.

पहिल्या टप्प्यात विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याची रणनीती आखली जाणार असून त्याबाबतचा आढावा सध्या केरळच्या दौऱ्यावर असलेल्या या टीमकडून घेतला जात आहे. पुढच्या टप्प्यात संपूर्ण १४० मतदारसंघनिहाय प्रभारी नेमून त्याच्या विजयी जबाबदारी संबंधित नेत्याच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते.

BJP Team
BJP Politic's : हकालपट्टी केलेल्या नेत्याची भाजपत पुन्हा दिमाखात एन्ट्री : थेट रवींद्र चव्हाणांच्या टीममध्ये स्थान; काय आहे पडद्यामागचे राजकारण?

महाराष्ट्राच्या या टीममध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचाही सहभाग आहे. कल्याणशेट्टी यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण केलेले आहे. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यामागे कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावलेले कल्याणशेट्टी आता केरळच्या मोहिमेवर दाखल झाले आहेत.

BJP Team
Mungantiwar Vs Kadam : संतापलेल्या सुधीरभाऊंनी शिंदेंच्या मंत्र्यांवर राग काढला; मंत्री अभ्यास करून आलेत का? मी उखाणा घ्यायला सांगतोय का?

दरम्यान, सचिन कल्याणशेट्टी यांनी यापूर्वी गोवा, तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही प्रभारी म्हणून काम केलेले आहे. या मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या विजयात कल्याणशेट्टी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. त्यामुळे फडणवीसांच्या विश्वासू टीममधील प्रमुख नेते म्हणून कल्याणशेट्टींची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com