Maharashtra Election Result : मतदारसंघ एकच, कुटुंबातील चारजण झाले आमदार; आता पतीचा पराभव करून पत्नी विधानसभेत

Political News : विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी झालेल्या पती-पत्नीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावर काही काळाचा अपवाद वगळता जाधव कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे.
Maharashtra Vidhansabha Election
Maharashtra Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या ठिकाणी झालेल्या पती-पत्नीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावर काही काळाचा अपवाद वगळता जाधव कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात जाधव कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा व सून आमदार झाले आहेत. (Maharashtra Election Result)

सर्वांचे लक्ष लागलेल्या कन्नड विधानसभा मतदारसंघात पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव करून त्यांच्या पत्नी व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव प्रथमच विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्यासह पती व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला.

Maharashtra Vidhansabha Election
Ausa Assembly 2024 Result: औसाः अभिमन्यू पवारांनी चक्रव्यूह भेदला; दिनकर माने यांचा पराभव

कन्नड मतदारसंघातून यापूर्वी 2009 व 2014 मध्ये एकावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एक टर्म शिवसेनेकडून ते आमदार होते तर 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व हर्षवधन जाधव यांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी केले होते. पती रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

Maharashtra Vidhansabha Election
Latur Assembly 2024 Result: लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सरंजामी थाटाची 'गढी' उद्ध्वस्त होता होता वाचली

त्याशिवाय हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांचे वडील दिवंगत रायभान जाधव हे देखील 1990, 1995 साली आमदार होते. त्यामुळे एकाच मतदारसंघातून एकाच घरातील चौघेजण आमदार होते. त्यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा व सून निवडून येण्याचा विक्रम झाला आहे. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar News : बारामतीच्या 'दादां'वर कोथरूडचे 'दादा' वरचढ; जिल्ह्यात सर्वाधिक लीड कोथरूड मधूनच...

दानवे यांच्या कुटुंबातील तिघे जण आमदार

आमदार झालेल्या संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे दानवे कुटुंबात देखील तीन आमदार आहेत. भोकरदन मतदारसंघातून रावसाहेब दानवे 1990, 1995 असे दोन टर्म आमदार होते तर संजना जाधव यांचे बंधू संतोष दानवे यांनी भोकरदन मतदारसंघातून आमदार म्हणून हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळे दानवे कुटुंबाच्या नावावर ही एक अनोखा विक्रम झाला आहे.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवारांची मोठी कबुली; म्हणाले, 'लाडकी बहीण योजनाच ठरली गेमचेंजर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com