Praniti Shinde Mangalvedha Melava : पंढरपूरमध्ये झालेली चूक प्रणिती शिंदेंनी मंगळवेढ्यात सुधारली!

Lok Sabha Election Result 2024 : पंढरपूरमधील आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे सर्व नेतेमंडळी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी होते.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

Solapur, 16 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूरमध्ये कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर आमदार (स्व.) भारत भालके आणि भगीरथ भालके यांचा फोटो नसल्यामुळे भालके समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. मात्र पंढरपुरात झालेली चूक प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यात सुधारली. मंगळवेढ्यातील कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर आमदार (स्व.) भारत भालके यांच्यासोबत मंगळवेढा बॅंकेचे संस्थापक रतनचंद शहा, दामाजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कि. रा. मर्दा वकिल यांचे फोटो छापण्यात आले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे राम सातपुते यांचा पराभव करत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) हे तब्बल 74 हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. या विजयात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाने प्रणिती शिंदेंना दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य दिले आहे. पंढरपूर-मंगळवेढ्यातून शिंदे यांना एक लाख 24 हजार 711, तर भाजपचे सातपुते यांना 79 हजार 291 मते मिळाली होती. पंढरपूर-मंगळवेढ्यातून प्रणिती शिंदे यांना 45 हजार 420 मतांचे लीड मिळाले होते

वास्तविक, पंढरपूरमधील आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे सर्व नेतेमंडळी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी होते. मतदारसंघातील ताकदवान नेते हे महायुतीच्या बाजूने असूनही पंढरपूरमधून प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले होते. प्रणिती शिंदे यांच्या बाजूने केवळ विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी एकाकी किल्ला लढवला होता.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन केले आहे. या कृतज्ञता मेळाव्याची सुरुवात पंढरपूरमधून केली. मात्र, पहिल्याच मेळाव्याच्या ठिकाणी प्रणिती शिंदेंना भालके समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पंढरपूरमधील मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या बॅनरवर आमदार (स्व.) भारत भालके आणि भगीरथ भालके यांचे फोटो नव्हते, त्यामुळे संतापलेल्या भालके समर्थकांनी प्रणिती शिंदे यांच्यासमोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. शेवटी भालकेंचे फोटो नसलेले बॅनर काढून ठेवण्यात येतील, असे खुद्द प्रणिती शिंदे यांनी सांगितले. त्यानंतरच भगीरथ भालके आणि समर्थक हे मेळाव्याला उपस्थित राहिले.

Praniti Shinde
BJP Vs Shivsena : भाजपने मैत्रीच्या नावाखाली आमचे उमेदवार पाडले, ते आमच्या लक्षात आलं नाही; शिवसेना नेत्याची खंत

पंढरपूरमधील गोंधळामुळे मंगळवेढ्यातील कृतज्ञता मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरात झालेली चूक दुरुस्त करत मंगळवेढ्यातील कृतज्ञता मेळाव्याच्या पोस्टरवर आमदार (स्व) भारत भालके, मंगळवेढा बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष रतनचंद शहा, दामाजी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कि. रा. मर्दा वकिल यांचे फोटो छापण्यात आले होते, त्यामुळे मंगळेवढ्याचा मेळावा सुरळितपणे पार पडला.

‘मताधिक्यांत पुढाऱ्यांचे योगदान नाही ’

या मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती वाकडे यांनी प्रणिती शिंदेंच्या मताधिक्क्याबाबत भाष्य केले. भाजप सरकारबद्दल जनतेत मोठा रोष होता, त्यामुळे जनतेने काँग्रेसला भरभरून मतदान केले आहे. त्यात कोणत्याही पुढाऱ्याचे योगदान नाही. भाजप आमदार समाधान आवताडे ज्या प्रभागात राहतात, त्या प्रभागात आत्तापर्यंत कधीही काँग्रेसला मताधिक्य मिळाले नाही. मात्र, प्रणिती शिंदेंना मताधिक्य मिळाले असे सांगितले.

Praniti Shinde
Kalyan Kale Vs Raosaheb Danve : खासदार काळेंनी दंड थोपटले, तिथेच रावसाहेब दानवेंचा आज दौरा...

तुम्ही प्रचारात कधी दिसला नाही : प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढ्यातील कृतज्ञता मेळाव्याच्या व्यासपीठावर प्रचंड गर्दी होती. यातील बहुतांश नेते हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कधीही काँग्रेसला मतदान करा म्हणून फिरले नाहीत अथवा प्रचार यंत्रणा हाताळली नाही. मात्र, विजयानंतर प्रणिती शिंदे यांच्या सत्कारासाठी गर्दी झाली होती. खासदार प्रणिती शिंदे यांनी हे हेरून एका पदाधिकाऱ्याला तुम्ही प्रचारादरम्यान दिसला नाही, असा खोचक सवाल केला, त्यामुळे हा मेळावा संबंधित पदाधिकाऱ्याच्या चांगलाच लक्षात राहील.

Praniti Shinde
Sachin Kalyanshetti Vs Praniti Shinde : ‘प्रणितीताई, शब्द जपून वापरा; आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल’; कल्याणशेट्टींचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com