Nagar Lok Sabha Voting : नीलेश लंकेंसाठी चिंतेची गोष्ट; होम ग्राउंड पारनेरमध्ये सर्वांत कमी मतदान

Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे यांना पारनेरचे माजी आमदार नीलेश लंके यांनी आव्हान दिले आहे.
Nagar Lok Sabha
Nagar Lok Sabha Sarkarnama
Published on
Updated on

Nagar, 13 May : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी तीनपर्यंत 41.35 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे नगर शहर विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 43.02 टक्के आहे. सर्वात कमी 34.63 टक्के मतदान हे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचा पारनेर विधानसभा मतदारसंघात झाले आहे. पारनेरमधून सर्वाधिक मताधिक्याचे स्वप्न पाहणाऱ्या लंकेसाठी ही थोडीसा चिंतेची गोष्ट आहे. इतर मतदारसंघात लक्ष देणाऱ्या लंकेंनी स्वतःच्या पारनेरमध्ये मतदानासाठी लक्ष दिले नाही का, अशी चर्चा दुपारनंतर रंगली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात (Nagar south Loksabha election) भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पारनेरचे माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आव्हान दिले आहे. लंके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, आमदारकीचा राजीनामा देऊन लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी सामील झाले आहेत. ते सध्या तुतारी चिन्हावर नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी उतरू नये, यासाठी अजित पवार गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटात (Sharad Pawar Group) सामील झाले आणि नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक लढवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar Lok Sabha
Maharashtra Lok Sabha 2024 Voting Live Updates : कोल्हापूरात सर्वाधिक मतदान, तर बारामतीत सर्वात कमी, जाणून घ्या टक्केवारी

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांना मतदारांचा पाठिंबाही मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे प्रचारात दिसून आले. मात्र, सकाळपासून येणाऱ्या मतदानाच्या आकडेवारीनुसार पारनेर विधानसभा मतदारसंघातच संथ गतीने मतदान होत आहे. सकाळी सातपासून दुपारी एकपर्यंत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण 29.93 टक्के मतदान झाले होते. मात्र, पारनेरमध्ये 27.30 टक्के मतदान झाले होते. इतर विधानसभा मतदारसंघात चांगले मतदान होत असताना पारनेरमध्येच मतदानाचा टक्का कमी का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, दुपारी तीनच्या आकडेवारीनुसार 41.35 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक 43.02 टक्के मतदान हे नगर शहर आणि शेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. पारनेरमध्ये सर्वात कमी 34.63 टक्के मतदान झाले आहे. दुसरीकडे श्रीगोंदामध्ये 42.34 टक्के, शेवगावमध्ये 43.02 टक्के, राहुरीमध्ये 42.90 टक्के, कर्जत-जामखेड मध्ये 42.45 टक्के, तर नगर शहरात 43.02 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे पारनेरमध्येच मतदानाचा टक्का कमी का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Nagar Lok Sabha
Shirur Lok Sabha Voting : सहकार मंत्री वळसे पाटलांनी ‘व्हीलचेअर’वर येऊन बजावला मतदानाचा हक्क!

दुसरीकडे, विखे यांचे सर्वाधिक लक्ष हे नगर शहर विधानसभा मतदारसंघावरच आहे. त्यानुसार नगर शहराची वाटचाल सर्वाधिक मतदानाकडे होत आहे. मात्र, नीलेश लंके याचा स्वतःच्या पारनेरमध्ये मात्र कमी मतदान होताना दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लंके हे पारनेरमधून शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव करून निवडून आले होते. त्या निवडणुकीत लंके यांना 1 लाख 39 हजार 963 म्हणजे 61 टक्के मते पडली होती. आता औटी हे विखे यांच्या बाजूने काम करीत आहेत. त्यामुळे लंके यांचा घरचा मतदारसंघ असलेल्या पारनेरमध्ये किती टक्के मतदान करून घेतात, याकडे विरोधकांचेही लक्ष असणार आहे.

Nagar Lok Sabha
Beed Lok Sabha Voting : बीडमध्ये पहिल्या चार तासांत 16.62 टक्के मतदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com