Sakal Survey Loksabha 2024 : अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का; शरद पवार गटाला जनतेची पसंती...

Loksabha Election 2024 : राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेची पहिलीच निवडणूक होणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून, तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने राज्यातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात सत्ताधाऱ्याविषयी काहींसा नाराजीचा सूर दिसून येत आहे.
Sharad Pawar-Ajit Pawar
Sharad Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sakal Survey-2024 News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने राज्यभरातील जनतेचा कौल घेण्यात आला आहे. त्यात जवळपास ५० टक्के लोकांनी राज्य सरकारच्या कामावर नापसंती दर्शविली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या कामावरही सुमारे ४४ टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता असून, शरद पवार गटाला पसंती मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तविण्यात आलेला आहे.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेची पहिलीच निवडणूक होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने राज्यातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात सत्ताधाऱ्याविषयी काहींसा नाराजीचा सूर दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Ajit Pawar
Sakal Election Survey : भाजपला मतदान करायला आवडेल; 'सकाळ'च्या सर्व्हेत लोकांनी थेटच सांगितलं
Sakal Survey
Sakal SurveySarkarnama

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या पक्षाची निवड कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ३३. ६ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाला १८.५, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाला १२. ६ टक्के लोकांनी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १२.५ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ४.९ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३.९ टक्के, वंचित बहुजन आघाडीला ३.६ टक्के लोकांनी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. इतरांना ५ टक्के, तर अपक्षांना १.१ टक्के मते मिळण्याचा अंदाज 'सकाळ'च्या सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आलेला आहे.

Sharad Pawar-Ajit Pawar
Sakal Election 2024 Survey : केंद्र-राज्य सरकारच्या कामावर लोक किती समाधानी? काय सांगतो 'सकाळ'चा ताजा सर्व्हे?

दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरळ लढतीत दोन्ही आघाड्यांमध्ये टफ फाइट होताना दिसत आहे, त्यामुळे मागील निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुतीला आणखी जोर लावावा लागणार आहे. त्यात भाजप कोणती पावले उचलतोय, हे पाहावे लागणार आहे.

R

Sharad Pawar-Ajit Pawar
Sakal Election 2024 Survey : भाजपची जबरदस्त तयारी, लोकांच्या मनात महाविकास आघाडी; काय सांगतो 'सकाळ'चा महासर्व्हे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com