Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत खरा करेक्ट कार्यक्रम 'गोपीचंद पडळकरांचा' : जयंत पाटील, विशाल पाटील अन् सुहास बाबर यांचा स्कोअर सेटल!

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत भाजपच्या पराभवापेक्षा गोपीचंद पडळकरांचा 'करेक्ट कार्यक्रम' चर्चेत आहे.
Beyond BJP's defeat, it's a major setback for Gopichand Padalkar
Beyond BJP's defeat, it's a major setback for Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटलांकडून "करेक्ट कार्यक्रम अशा बातम्या आज सकाळपासूनच येत आहेत. जिल्हा परिषदेत भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ यांचा 9 मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता पाटील यांना 34 मतं मिळाली तर मासाळ यांना 25 मतांवर समाधान मानावे लागले.

पण या पराभवानंतर खरा करेक्ट कार्यक्रम झाला आहे तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा. सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ताकद वाढत असलेल्या पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत करेक्ट कार्यक्रम केला आहे. यामुळे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांच्यापासून शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्यापर्यंत सगळ्या नेत्यांचा स्कोअर सेटल झाला आहे.

सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांचे जुने वैर. पडळकरांकडून अनेकदा जयंत पाटलांवर खालच्या स्तरावर टीका झाल्या. अगदी दिवंगत राजारामबापू पाटील यांच्यावरही भाष्य करायला पडळकरांनी मागे-पुढे बघितले नव्हते. त्यामुळे पडळकरांचे उट्टे काढायला जयंत पाटील एक संधीच शोधत होते. विशाल पाटील हे तर मागील 7 वर्षांपासून पडळकरांना धडा शिकवण्याची वाट बघत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पडळकर यांच्यामुळेच विशाल पाटील यांचा पराभव झाला होता.

जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या सुहास बाबर यांचाही स्कोअर सेटल करून दिला आहे. बाबर आणि पडळकर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून टोकाचा संघर्ष बघायला मिळाला आहे. एकमेकांवर टीका आणि आरोपांनी खानापूर-आटपाडीचे वातावरण ढवळून निघाले होते. मिरजमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही बाबर यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा पद्धतीने राजकारण होत असेल तर त्यांच्यासोबत सत्तेत बसण्याचा आग्रह का धरता अशी भूमिका बाबर यांनी घेतली होती.

Beyond BJP's defeat, it's a major setback for Gopichand Padalkar
Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली : संजयकाकांच्या 2 सदस्यांचं भाजपला मतदान, सुहास बाबर यांनाही दोघांचा धक्का

गोपीचंद पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम कसा झाला?

सांगली जिल्हा परिषदेत भाजपचे 16 सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी तब्बल 8 सदस्य जत तालुक्यातून निवडून आले आहेत. यामागे गोपीचंद पडळकर यांचाच करिश्मा मानला जातो. शिवाय आटपाडीतील निंबवडे गटातून माधवी पडळकर याही निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 पैकी 9 सदस्य हे गोपीचंद पडळकर यांना मानणारे आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे मिरज तालुक्यातून 6 आणि वाळवा तालुक्यातून एक सदस्य निवडून आला आहे.

थोडक्यात अध्यक्ष करायचा झाल्यास तो पडळकर यांच्याच गटातील असणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे जत तालुक्यातील डफळापूर गटातील स्वप्नाली मासाळ यांना अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली. या उमेदवारीविरोधात सुरुवातीला आमदार सुहास बाबर यांनी शिवसेनेकडून शितल बाबर यांना अर्ज दाखल करायला लावला आणि नंतर तो मागे घेतला. पण शिवसेनेचे 2 सदस्य अनुपस्थित राहिलेच. याचा फायदा थेट महाविकास आघाडीला होणार होता.

Beyond BJP's defeat, it's a major setback for Gopichand Padalkar
मोठी बातमी : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम : अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील

सभागृहात शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य भाजपसोबत गेले असते तरी महाविकास आघाडीचा सहज विजय झाला असता. 2 सदस्य अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा 30 वर आला असता. त्यानंतर महायुतीत भाजपकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेस 6, शिवसेना 5, जनसुराज्य 1 आणि रयत 1 असा 29 आकडा झाला असता. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस 18, काँग्रेस 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 असे 30 सदस्य झाले असते.

पण राष्ट्रवादीचे सदस्य निवडणूकपूर्व आघाडी म्हणून महाविकास आघाडीसोबतच राहिले आणि संगीता पाटील या 34 मतं घेत सांगली जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्षा झाल्या आहेत. त्यामुळे इथे जेवढा करेक्ट कार्यक्रम भाजपचा आहे, जेवढा चंद्रकांत पाटील यांचा आहे, त्याहून जास्त गोपीचंद पडळकर यांचा कार्यक्रम झाला आहे, असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com