मोठी बातमी : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम : अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादीच्या संगीता पाटील ३४ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना २५ मते मिळाली असून त्यांचा ९ मतांनी पराभव झाला.
Sangeeta Patil as the new President of Sangli Zilla Parishad
Sangeeta Patil as the new President of Sangli Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांचा विजय झाला. त्यांना तब्बल 34 मते मिळाली. तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली असून त्यांचा 9 मतांनी पराभव झाला. या निकालानंतर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 सदस्यांनी महाविकास आघाडीची साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज (बुधवारी) सकाळी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कासेगावमधील संगीता पाटील यांना तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ऋषिकेश लाड यांना उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्या बाजूला भाजपकडून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ यांनी तर उपाध्यक्षपदासाठी जयराज पाटील यांनी अर्ज दाखल. यानंतर अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली. शिवसेनेच्या शितल बाबर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

वाटाघाटीनंतर शिवसेनेच्या बाबर यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संगीता पाटील आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांच्यात तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि शिवसेनेचे हिम्मत जाधव यांच्यात लढत अंतिम झाली. यानंतर दुपारी 2 वाजता सर्व जिल्हा परिषद सदस्य विशेष सभेसाठी सभागृहात दाखल झाले आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली.

Sangeeta Patil as the new President of Sangli Zilla Parishad
Shiv Sena withdrawal Sangli ZP news : सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची तासाभरातच माघार : अध्यक्षपदासाठी पाटील विरुद्ध मासाळ तर उपाध्यक्षपदासाठी लाड-जाधव भिडणार!

भाजपकडून सर्व सदस्यांसोबत आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय पाटील, शिवसेनाेचे अमोल बाबर, जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदमही सभागृहात दाखल झाले. तर महाविकास आघाडीच्या सदस्यांसोबत खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार मानसिंग नाईक, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड सभागृहात दाखल झाले.

Sangeeta Patil as the new President of Sangli Zilla Parishad
Sangli ZP President : सांगली ZP मध्ये भाजप अन् शिवसेनेकडूनही अध्यक्षपदासाठी अर्ज : सुहास बाबर यांचे 3 सदस्य फुटीच्या उंबरठ्यावर

निवडीवेळीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्याचे स्पष्ट :

सभागृहात निवडीवेळीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत असलेले संजयकाका पाटील काही दिवसांपासून भाजपसोबत दिसत होते. आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 पैकी 2 सदस्यही भाजपच्या बाजूने गेले. तर शिवसेनेचे दोन सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. त्याचा महाविकास आघाडीला थेट फायदा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य शेवटच्या क्षणी भाजपसोबत गेले असते तरी महाविकास आघाडीचा सहज विजय झाला असता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com