Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या बंडामागे बड्या नेत्याची खेळी; दिल्लीपासून गोवर्धनवाडीपर्यंत हलवली सूत्रं

Dharashiv Shivsena Politic's : ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या राजकीय निर्णयामागे शिवसेनेतील एका प्रभावशाली नेत्याची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा रंगली आहे.
Omraje Nimbalkar-Eknath shinde
Omraje Nimbalkar-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv, 21 June : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले असले तरी सर्वाधिक चर्चा ही ओमराजेंच्या बंडखोरीची झाली. मात्र, त्यामागे शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा असून तो नेता ओमराजेंच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून होता. बैठकीच्या ठिकाणापासून काही अंतरावर बसून त्यांनी ओमराजेंच्या शिवसेना एन्ट्रीची मोहिम फत्ते केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाच नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर गेला होता. त्या ठिकाणी शिंदे आणि संबंधित नेत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच नेत्याने ओमराजेंना शिवसेनेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे आता स्पष्ट होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे संजय जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी बंड करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा ही धाराशिवच्या ओमराजेंची होत आहे. कारण ओमराजे फुटतील, असं कोणालाही वाटत नव्हतं. मात्र, त्यांच्या फुटीची बीजे ही धाराशिवमधून रोवली गेल्याचे पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत एका शिक्षणसम्राट नेत्याने दिल्ली दौरा करत गुप्तपणे अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीच ओमराजेंसह या सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशाची पटकथा लिहिली गेल्याचे स्पष्ट होत आहे.

Omraje Nimbalkar-Eknath shinde
Omraje Nimbalkar : त्यांच्या मांडीला मांडी लावून नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार, त्यासाठीच हा निर्णय : ओमराजेंचा राणा पाटलांविरोधात नव्याने एल्गार

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या नेत्याकडे मंत्रिपद होते. मात्र फडणवीस सरकारमध्ये संबंधित नेत्याला मंत्रिपद मिळू शकले नव्हते, त्यामागे धाराशिवमधील राजकारण असल्याचे सांगण्यात येत आहे. धाराशिवमधील भाजप नेत्यानेही त्यांच्या मंत्रिपदाला कडाडून विरोध केल्याची चर्चा आहे.

संबंधित नेत्याचा पुतण्या फोडून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केल्याचा रागही त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे धाराशिवमधील भाजप नेत्याला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेच्या या बड्या नेत्याने थेट ओमराजेंनाच शिवसेनेत आणण्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे. ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशामागे ह्याच बड्या नेत्याचा ब्रेन असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

Omraje Nimbalkar-Eknath shinde
Omraje Nimbalkar : पद्मसिंह पाटलांच्या तेरमधील शिवसैनिक म्हणतात : ओमराजेंनी जिथं आहे, तिथंच थांबावं : निर्णय घेतला, तर शुभेच्छा; आम्ही उद्धवसाहेबांसोबतच

दरम्यान, शिवसेनेचा हा बडा नेता धाराशिवमध्ये ठाण मांडून होता. ओमराजे यांचे गाव असलेल्या गोवर्धनवाडीपासून हाकेच्या अंतरावर बसून त्यांनी सूत्रे हलवल्याची माहिती आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com