Pawar-Shinde News : लढणाऱ्या लेकींसाठी 'बाप' बुलंद कहाणी; शिंदे-पवारांनी सोलापूर-बारामतीची सूत्रे घेतली हाती!

Lok Sabha Election 2024 : खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यापेक्षा अधिक सक्रिय व्हावे लागत असल्याचे सध्याचे राजकीय वातावरण आहे. दुसरीकडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदेंसाठी सोलापूरमध्ये बसून सूत्रं हलवत आहेत.
Supriya Sule-Sharad Pawar& Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Supriya Sule-Sharad Pawar& Praniti Shinde-Sushilkumar Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 April : महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जी दोन नावे घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत कर्तृत्व गाजवलेले दोन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघे लेकींसाठी मतदारसंघात उसवलेली घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यापेक्षा अधिक सक्रिय व्हावे लागत असल्याचे सध्याचे राजकीय वातावरण आहे. दुसरीकडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदेंसाठी सोलापूरमध्ये बसून सूत्रं हलवत आहेत.

शरद पवार (Shaead Pawar) हे 1967 पासून निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी बारामतीमधून 1967 मध्ये प्रथम विधानसभेची निवडणूक लढवली होती. पवार हे स्वतः उमेदवार असायचे, त्यावेळीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर फिरायचे. शेवटची सांगता सभा तेवढी बारामतीत (Baramati) पवार घ्यायचे, हे चित्र बारामतीत वर्षानुवर्षे दिसून यायचे. अगदी 2019च्या निवडणुकीपर्यंत हे चित्र कायम होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule-Sharad Pawar& Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Mohite Patil Meet Pawar : धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यात घेतली शरद पवारांची भेट; सांगोल्याचे देशमुखही सोबत!

अजित पवार यांनी भाजपसोबत जात वेगळी भूमिका घेतल्याने बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महाविकास आघाडीकडून, तर सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बारामतीत प्रथमच दोन तुल्यबळ उमेदवार समारोसमोर आले आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या रूपाने सुप्रिया सुळे यांच्यासमाेर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, त्यामुळे शरद पवार यांना बारामती मतदारसंघात अधिक लक्ष घालावे लागत असल्याचे वातावरण सध्या दिसत आहे. इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर आदी मतदारसंघांत पवारांनी निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराचा धडाका लावला आहे. कारण, अजित पवार यांच्या रूपाने घरातूनच आव्हान मिळाले आहे.

Supriya Sule-Sharad Pawar& Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Karmala Politics : नारायण पाटलांना भेटायला जाताना चंद्रकांतदादांनी निंबाळकरांना सोबत नेणे टाळले!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल ते लोकसभेतील सभागृह नेते अशी चढती राजकीय कमान चढणारे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यापुढे मुलीला निवडून आणण्याचे आव्हान आहे. कारण सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांचा मागील दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच, शिंदे मुख्यमंत्री असताना पत्नी उज्ज्वला शिंदे यांचाही 2009 मध्ये सोलापूरमध्ये पराभव झाला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ खुला असतानाही सुशीलकुमार शिंदे हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेले आहेत. मात्र, मागील दोन निवडणुकांत खुद्द शिंदेंनाच सोलापूरमध्ये पराभवाचे धनी व्हावे लागले आहे.

आई उज्ज्वला शिंदे आणि वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचे दुःख धुऊन काढण्यासाठी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी यंदा चंग बांधला आहे. काँग्रेसच्या तिकिटावर त्या सोलापूरमध्ये निवडणूक लढवत आहेत. सुशीलकुमार शिंदेंही मतदारसंघात ठाण मांडून सूत्रं हलवत आहेत. याशिवाय राजकीय बेरीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. लेकीच्या विजयासाठी दुरावलेल्या जुन्या सहकाऱ्यांना ते आपलेसे करत आहेत. त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो, हे पाहावे लागणार आहे.

R

Supriya Sule-Sharad Pawar& Praniti Shinde-Sushilkumar Shinde
Madha Lok Sabha 2024 : मोहिते पाटील आज पवारांना भेटणार; राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com