Top Ten News : जाणून घ्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या राजकीय घडामोडी!

जाणून घेऊयात आज दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी
top 10 news
top 10 news Sarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी

1.पुण्यातील राड्यामागे संभाजीराजे...लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप.. तर ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव, असंही विधान

2.महाविकास आघाडीमध्ये 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत, जवळपास अडीचशे जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत...सूत्रांची माहिती

3. 'आमचं आयुष्य उध्वस्त करून ते पक्ष, चिन्ह घेऊन गेले; सुप्रिया सुळेंचा कोणावर राग?

4.मंत्रिमंडळाच्या बैठकीत 138 कोटी 55 लाख निधी मंजूर...जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

5. सर्व्हेच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका, खरी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांना सांगा, आमदार भावना गवळींचा सदाभाऊ खोतांना टोला

top 10 news
Praniti Shinde : येत्या दोन महिन्यांत सरकारच्या सर्व योजना बंद होणार; प्रणिती शिंदेंचा दावा

6. आम्ही बँका, कारखाने, सरकार बुडवलं..दहा-वीस कोटी हाणतोय अन् तुम्ही 5 हजार अनुदान मागताय...श्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची तुलना करताना सदाभाऊ खोतांचं अजब विधान

7. ग्रामपंचायतीचं पद सोडत नाहीत, पण तुमच्या आमदारानं मंत्रिपद सोडलं...म्हणून सीएम मतदारसंघाला झुकतं माप देतात...भरसभेत भरत गोगावलेंचं विधान

8. संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता...'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' हे नाव तर निवडणूक लढवण्यासाठी सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह

top 10 news
Pune Crime : पुण्यातील कोयता गँगचा होणार बंदोबस्त! गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले 'हे' पाऊल

9. लोकसभेत काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा आल्या... त्यामुळे मविआचं सरकार आल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार... पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान...

10. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती... नाराज आमदारांना खुश करण्याचे प्रयत्न...बड्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा महायुतीचा प्रयत्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com