Atal Bihari Vajpayee India Shining : ...तेव्हा वाजपेयींचे ‘इंडिया शायनिंग’ काळवंडले अन् ‘यूपीए रायझिंग’ झाले! असे खोटे ठरले होते Exit Poll…

Lok Sabha election 2024 Results Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.  
Atal Bihari Vajpayee, Narendra Modi
Atal Bihari Vajpayee, Narendra ModiSarkarnama

Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलने इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला असून एनडीएचा आनंदाला पारावार उरला नसेल. पण प्रत्येकवेळी एक्झिट पोलचे आकडे खरे ठरतातच असे नाही. नुकत्याच झालेल्या कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही हे अंदाज फसले होते. तसे ते 2004 च्या लोकसभेवेळीही पुरते खोटे ठरले होते.

2004 ची निवडणूक भाजपची धडा देणारी ठरली. यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लोकप्रियतेने शिखर गाठले होते. देशात अनेक सुधारणा झाल्या असून जनता खूश असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. असे असूनही त्यांनी सहा महिने आधीच निवडणुका लावत ‘इंडिया शायनिंग’चा नारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2004 ची निवडणूक जिंकणार असल्याचा प्रचंड आत्मविश्वास वाजपेयींसह पक्षातील इतर नेत्यांनाही होता. वाजेपयींच्या आवाजातील संदेशांपासून ठिकठिकाणी इंडिया शायनिंगचे होर्डिंग, फलक लावत भाजपने चांगलीच वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार, असे विरोधकांना वाटू लागले होते.

भाजपचे त्यावेळची चाणक्य समजले जाणार नेते प्रमोद महाजन यांची इंडिया शायनिंग ही कल्पना असल्याचे मानले जात होते. तर दुसरीकडे 2003 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांमध्येही ‘इंडिया शायनिंग’ने धडकी भरवली होती.

Atal Bihari Vajpayee, Narendra Modi
Assembly Election Results : अरुणाचलमध्ये भाजपचा डंका, अजितदादांचीही कमाल; सिक्कीममध्ये SKM ची जादू

एक्झिट पोलचा कल होता भाजपच्या बाजूने

तीन राज्यांतील भाजपचा विजय आणि इंडिया शायनिंगच्या नाऱ्याचे प्रतिबिंब त्यावेळच्या एक्झिट पोलमध्येही दिसले होते. भाजपप्रणित एनडीएला 240 ते 275 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेस प्रणित यूपीएचा पुन्हा पराभव होईल, असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते.

प्रत्यक्षात एनडीएला 187 तर यूपीएला 216 जागा मिळाल्या. या निकालाने एक्झिट पोलचे आकडे सपशेल खोटे ठरले होते. वाजपेयींच्या इंडिया शायनिंगची जादू चालली नाही आणि यूपीएचे रायझिंग झाले. भाजपच्या काही नेत्यांकडून अजूनही ‘इंडिया शायनिंग’च्या नाऱ्यामुळे पराभव झाल्याची कबुली दिली जाते.

यंदा विकसित भारतचा नारा

भाजपने 202 मध्ये विकसित भारत आणि 400 पारचा नारा दिला आहे. निवडणुकीआधी प्रत्येक गावात विकसित भारतचा रथ पोहचवला. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांतून जोरदार जाहिरातबाजी केली. पण प्रत्यक्ष प्रचारामध्ये हा मुद्दा फारसा चालल्याचे दिसले नाही.

Atal Bihari Vajpayee, Narendra Modi
Lok Sabha Election Exit Poll : एक्झिट पोलचे आकडे मॅनेज केले', काँग्रेस नेत्याचा मोदींवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा, राम मंदिर, कलम 370, पाकिस्तान, चीन, आणीबाणी, आरक्षण आदी मुद्यांभोवती एनडीएचा प्रचार फिरत राहिला. तर विरोधी पक्षांनी मोदींवर टीका करण्यासह बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यांवर जोर दिला. मोदी सरकारविरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावा करत विरोधकांनी प्रचार केला. तर मोदींच्या लाटेवर सत्ताधारी स्वार झाले होते.

काही राजकीय विश्लेषकांकडून एनडीएला मागील निवडणुकीएवढ्याच जागा मिळतील, असे सांगितले जात होते. तर काहीजण भाजपला बहुमता आकडा गाठता येणार नाही, असे अंदाज वर्तवत होते. मात्र, एक्झिट पोलने विश्लेषकांचे अंदाज मोडित काढत भाजपला ‘400 पार’ नसले तरी ‘400 पर्यंत’ पोहचवले आहेत. त्यामुळे आता यावेळचे पोल खरे ठरणार की ‘इंडिया रायझिंग’सारखी अवस्था ‘विकसित भारत’ची होणार हे चार जूनलाच स्पष्ट होईल.

Atal Bihari Vajpayee, Narendra Modi
Somanath Bharati: एक्झिट पोल ठरणार खोटे ; मोदी तिसऱ्यांदा PM झाले तर मुंडन करेन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com