Maharashtra Politics Impact : दिल्लीतील निकालाचा महाराष्ट्रावर होणार 'इफेक्ट'? ऑपरेशन टायगर अन् स्थानिकच्या निवडणुकीवर 'वॉच'

Delhi Election Results 2025 News : येत्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हॊणार आहेत. त्याठिकाणी याचा परिणाम जाणवणार आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी झाला. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत पुनः सत्तेत आला आहे. या निवडणुकीत 13 वर्ष सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाला पहिल्यांदाच पराभवाचा झटका बसला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 48 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले.

त्यातच आता दिल्लीत भाजपने दमदार कामगिरी केली असल्याने येत्या काळात या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे. येत्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हॊणार आहेत. त्याठिकाणी याचा परिणाम जाणवणार आहे. त्यातच सध्या राज्यात महायुतीकडून ऑपरेशन टायगर राबवले जाण्याची शक्यता असल्याने त्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejrival) यांच्या हातातून दिल्ली भाजपकडे गेली. त्याचे दिल्लीसह इतर राज्यातील राजकारणावर परिणाम होणार आहेत. याच परिणाम आगामी काळात निवडणुका होत असलेल्या राज्यावर परिणाम जाणवणार आहे. येत्या काळात या निकालाचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून निर्माण झालेल्या एका पक्षाचा ज्याठिकाणी उदय झाला ती दिल्ली त्यांच्या हातातून निसटली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय असतित्वासाठी आम आदमी पक्षाला झगडावे लागणार आहे.

Mahayuti Vs MVA
Delhi BJP news : भाजपच्या राम शिंदेंनी डिवचलं; आता 'AAP' अन् काँग्रेस रडणार

काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला (Bjp) अपयश आले होते. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महायुतीला सॊबत घेत विधानसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती यश मिळवले होते. लाडकी बहीण योजनेचा भाजप आणि महायुतीला फायदा झाला होता.

Mahayuti Vs MVA
BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल जसा दिल्लीच्या निवडणुकांमध्ये जाणवला तसा तो भाजपसाठी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच महायुती व महाविकास आघाडी करीत आहे. त्यामुळे दिल्लीत कॊणाचे सरकार येणार याकडे दोन्ही बाजूच्या नेत्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याने पुन्हा एकदा महायुतीचे कॉन्फिडन्स वाढणार आहे.

Mahayuti Vs MVA
Arvind Kejriwal Defeat : दिल्लीत केजरी'वॉल' उद्ध्वस्त; बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का, आतिशींची आतषबाजी...

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात महायुतीकडून ऑपरेशन टायगर राबवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार व आमदार महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. त्यामुळे आता या फोडाफोडीच्या राजकारणाला या निकालामुळे बळ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे.

Mahayuti Vs MVA
Arvind Kejrival : केजरीवालांचे अण्णा हजारेंसोबतचे संबंध का ताणले गेले; काय आहेत नेमकी कारणं ?

दरम्यान, आपच्या पराजयाचा देशाच्या राजकारणावर परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यामुळे येत्या काळात भाजपच्या विरोधातील पक्षांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते. जरी आप राजकीय दृष्ट्या तळागाळापर्यंत पोहोचला नसला तर भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनामुळे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष काही राज्यात पोहचवला होता.

Mahayuti Vs MVA
Nitin Gadkari : गडकरी यांनी करून दाखवले, 'मिहान'मध्ये एक लाख युवकांना रोजगार

डिसेंबरमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही दोन्ही राज्य महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे उत्तर भारतात या राज्याच्या राजकारणाचा परिणाम जाणवतो. त्यामुळे जर भाजप विजयी झाला तर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Mahayuti Vs MVA
Jayant Patil : राज्यात पुन्हा भूकंप? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? गडकरींचा इस्लामपूर दौऱ्याचं नेमकं कारण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com