Nagpur Viral Video : शासन आपल्या दारी ते शासन 'बिअर बारच्या दारी': फडणवीसांच्याच नागपूरमधून झाली सुरुवात

Nagpur Viral Video : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून थेट नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहचू लागल्या. सर्व प्रकारचे दाखले व योजनांचा थेट लाभ मिळाल्याने सर्वसामान्य जनतेला फायदा झाला.
Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Viral Video : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम सुरू झाला होता. सरकारच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुकही झाले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पण, 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून थेट नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहचू लागल्या. सर्व प्रकारचे दाखले व योजनांचा थेट लाभ मिळाल्याने सर्वसामान्य जनतेला फायदा झाला.

पण नुकताच नागपूरमधील एका बिअर बारमधील व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शासन 'बिअर बारच्या दारी' अशी उपहासात्मक चर्चा सुरु झाली आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शिस्तप्रिय आणि निर्णयक्षम मुख्यमंत्री अशी ओळख आहे. पण याच फडणवीस यांच्या नागपूरमधील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे महायुती सरकारच्या शिस्तीवर, नैतिकतेवर आणि पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
Shivsena Politics : भास्कर जाधवांना मोठा धक्का, बालेकिल्ल्यातच घेरले! तीन मोठ्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

नेमकं काय घडलं आहे?

नागपूरमधील मनीषनगर परिसरात एक बिअर बार आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास 3 जण या बारमध्ये आले. इथे येताच त्यांनी टेबलवर 'महाराष्ट्र शासन' लिहिलेल्या सरकारी कामाच्या फाईल्सचा गठ्ठा ठेवला. दारूची ऑर्डर दिली. दारुचा एक एक घोट निवांत रिचवत या फाईल्समधील कामांवरून तिघांमध्ये चर्चा सुरु झाली. चर्चा चांगली तासभर रंगली होती. गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच एक जण त्यातील फाईलींवर भराभर सह्या करु लागला. या व्हिडीओनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
BJP Politics : बागुल, राजवाडे आत.. आता भाजपने लावला हाउसफुल्लचा बोर्ड

महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय कामकाज बारमधून चालवणारे ते अधिकारी कोण? ते कोणत्या विभागाचे होते? रविवारी या साप्ताहिक सुट्टीदिवशी देखील सरकारी फाईल्स कार्यालयाबाहेर आल्याच कशा? त्या कोणत्या फाईल्स होत्या? ते अन्य दोघे जण कोण होते? त्या फाईलींसोबत त्यांचा कसा आणि काय संबंध होता? या फाईल्समधील सह्यांनंतर अधिकाऱ्यांसोबत बसलेल्या त्या दोघांना किंवा अधिकाऱ्याला काही लाभ होणार आहे का? या व्हिडीओची दखल घेतली जाणार का? असे अनेक सवाल या निमित्ताने विचारले जात आहेत.

Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
Devendra Fadnavis : सर्वसाधारण ग्राहकांचं वीजेचं बील 2030 पर्यंत 26 टक्क्यांनी कमी होणार! फडणवीसांनी सांगितला फॉर्म्युला

खरंतर शासकीय फाईल ही कोणत्याही अधिकाऱ्याची जबाबदारी असते. ती सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बिअर बारमध्ये घेऊन जाणे, ही एक तर हलगर्जीपणाची परिसीमा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रशासनाची अधोगती दर्शवणारे लक्षण असल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशा घटनांमुळे जनतेचा राज्य सरकारवर असलेला विश्वास कमी होत चालला आहे. नागपूर ही भाजपच्या दृष्टीने 'राजकीय राजधानी' आहे. त्यामुळेच याच ठिकाणी प्रशासनाची अशी स्थिती असल्यास, इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल?, याची कल्पना करता येत नाही.

Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
Thackeray brothers political strategy : राज ठाकरे मातोश्रीवर जाताच महायुतीचे नेते अलर्ट: गणेशोत्सव, दहीहंडीचं निमित्त साधत 'प्लॅन बी' तयार

एकूणच शासकीय अधिकारी बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन जाणे, तिथे दारुच्या नशेत सह्या करणे असे व्हिडिओ पुढे येत असतील, तर नक्कीच ही गोष्ट जनतेच्या विश्वासाला तडा देणारी आहे. शासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा हा प्रकार आहे. जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असल्यास त्या अधिकाऱ्यांची आणि त्या फाईलींची संपूर्ण माहिती समोर आणणे गरजेचे आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. तरंच इतरांनाही यातून धडा मिळेल.

Viral Nagpur video shows three individuals handling Maharashtra government files inside a beer bar, triggering outrage and demands for inquiry.
Thackeray brothers meeting : 'मातोश्री'वरील ठाकरे बंधुंच्या भेटीमागे नेमके काय 'राज'कारण? युतीसाठी पडद्यामागे हालचाली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com