Thackeray brothers meeting : 'मातोश्री'वरील ठाकरे बंधुंच्या भेटीमागे नेमके काय 'राज'कारण? युतीसाठी पडद्यामागे हालचाली!

Matoshree politics News :एकीकडे महाविकास आघाडीला गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महायुतीकडे इनकमिंग होत आहे.
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तरी सुरु केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी गेल्या काही दिवसापासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडीला गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महायुतीकडे इनकमिंग होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे (MNS) व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार आवाज उठवला. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसले हे वेळीच ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर पाठीमागे घेतले. त्यानंतर ठाकरे बंधूनी २० वर्षांनी एकत्र येत वरळीत विजयी मेळावा घेतला. त्याला मुंबईतील मराठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांनी निवडणुकीसाठी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याविषयी सस्पेन्स ठेवला होता.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे 'मातोश्री'वर, 22 दिवसांत दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंना भेटले, कारणही आहे खास!

ठाकरे बंधूनी एकत्र येण्याविषयी ठोसपणे काहीच सांगितले नसल्याने त्याचमुळे गेल्या काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी पत्ते ओपन केलेले नाहीत. दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसे व उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत प्रवक्त्यांनी बोलू नये, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ब्रेक लागला की काय? अशास्वरूपाच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, या सर्वच विषयावर पडदा टाकत राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Raj Thackeray Uddhav meeting : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, मला खूप....

राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन युतीबाबत एकदम दोन पावले पुढे टाकली आहेत. यापूर्वी वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युती करण्याची तयारी दर्शवत एक पाऊल पुढे टाकले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे यांनी याबाबत सस्पेन्स वाढवत त्यांनी युतीबाबत वक्तव्य करणे टाळले होते. मात्र, त्यानंतर 20 दिवसातच एक नव्हे तर दोन पावले पुढे टाकले असल्याचे पाहवयास मिळाले. यावेळी दोन्ही बंधूंमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे यावेळी युतीबाबाबत सकारात्मक बोलणे झाले असण्याची शक्यता आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Raj Thackeray Surprise: उद्धव ठाकरेंना वाढदिनी दिले 'हे' सरप्राईज; मातोश्रीवर ठाकरे बंधुंची सहा वर्षानंतर गळाभेट

त्याचमुळे आता आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषगाने ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली आहे. ठाकरे बंधुंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तरी त्यामधून राजकीय घडामोडीही घडण्याची शक्यता आहे. एकीकडे महापालिका निवडणुका जवळ येत असतनाच ठाकरे बंधुंमध्ये ही जवळीक वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा नक्कीच झाली आहे. त्यामुळे येत्या काळात युतीबाबत आणखी एक पाऊल त्यांनी पुढे टाकले आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Raj Thackeray Politics : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर 'तो' एक शब्द वापरला अन् एकनाथ शिंदेंचे शिलेदार धास्तावले!

जुलै महिन्यात ठाकरे बंधुंची पहिल्यांदा विजयी मेळाव्याच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर एकाच महिन्यातील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी युती पाहायला मिळणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ठाकरे बंधुंच्या या भेटी राज्याच्या राजकारणाला कशी कलाटणी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सर्व शिवसैनिकांना युतीची उत्सुकता लागली असतानाच त्याच दृष्टीने ठकरे बंधूंची पावले पडत आहेत.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?

दुसरीकडे राज ठाकरे यांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विट करीत असताना उद्धव ठाकरे यांचा आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा केलेला उल्लेख अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेतेमंडळी या ट्विटवरून अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या अडचणीत देखील येत्या काळात भर पडणार आहे.

मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात घेताना भाजपसमोरील अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळेच ठाकरे बंधुंच्या या भेटीमागील नेमके 'राज'कारण समजून घेऊन महायुतीला येत्या काळात त्यांच्या रणनीतीत बदल करावा लागणार आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
BJP Mahayuti Bhandara Bank : गोंदिया, चंद्रपूर जिंकले, आता महायुतीचे लक्ष भंडारा बँकेकडे; पटोले अन् पटेल यांच्या वर्चस्वाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com