चव्हाण-देशमुख-पाटलांच्या बालेकिल्ल्यात गिरीश महाजनांना पालकत्वाचे आव्हान

गिरीश महाजन यांच्याकडे नांदेड, लातूर, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला (Congress) नामोहरम करण्यात वाटा असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री यांच्या नांदेड (Nanded), लातूर (Latur) आणि धुळे (Dhule) जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची आव्हानात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. (Girish Mahajan holds Guardian Ministership of Nanded, Latur, Dhule district)

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक मानले जाते. अनेक वेळा त्यांनी पक्षाला वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते निकटचे मानले जातात. एकेकाळी जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा मोठा दबदबा होता. गिरीश महाजन ज्या जामनेर मतदारसंघातून निवडून येतात, तेथेही काँगेस पक्षाचे वर्चस्व होते. अशा ठिकाणी संघटन कौशल्य वापरून महाजन यांनी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविली आहे. गेली पाच टर्म ते जामनेरचे आमदार आहेत. आता त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

Girish Mahajan
शिंदे-फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाला कोणता जिल्हा पहा...

नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. नांदेडमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे चार आमदार आहेत. जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे.

Girish Mahajan
त्या मोठ्या नेत्यानेही स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवलं नाही : सीतारामन यांचा पवारांवर नाव न घेता निशाणा

लातूर हा माजी मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांचा जिल्हा आहे, त्यांचे पुत्र अमित आणि धीरज देशमुख सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. तर धुळे जिल्हा काँग्रेसचे नेते व मुख्यमंत्रिपदासाठी शेवटपर्यंत चर्चेत नाव असलेले पण कायम हुलकावणी दिलेल्या रोहिदास (दाजी) पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांचे पुत्र कुनाल पाटील सध्या धुळे ग्रामीण मतदार संघात काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.

Girish Mahajan
शिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात : अब्दुल सत्तारांचा मोठा दावा

काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे. आगामी काळात ते आव्हान कसे पेलणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com