

West Bengal News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची मोठी वाताहत झाली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरी आणि नाराजी यांनी चव्हाट्यावर आली आहे. टीएमसीमधला हा अंतर्गत संघर्ष थेट पक्षफुटीपर्यंत पोहोचला आहे. बंडखोर आमदार -खासदार दोन-तृतीयांश संख्याबळासह पक्षच फोडण्यात यशस्वी ठरले आहेत. अशा संकटात सापडलेल्या ममता बॅनर्जींना काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींनी मोठी ऑफर दिल्याचं समोर आलं आहे. ही ऑफर स्विकारणं तृणमूल काँग्रेससाठी फायद्याचं की तोट्याचं असणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांची सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जींना काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव देत मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडेतृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेससमोर ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवत त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीएमसीच्या 58 आमदारांनी केलेल्या बंडाचं निशाण फडकवलं होतं. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी दुसरा मोठा धक्का लोकसभेतील 20 खासदारांनीही स्वतंत्र गट निर्माण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, अरविंद केजरीवालांचा आम आदमी पार्टी हे पक्ष फुटल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याही टीएमसी पक्षात बंडाचं वारं शिरलं. आणि त्यानंतर दोन तृतीयांश आमदार व खासदारांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेनंतर टीएमसी पक्षाची मोठी वाताहत झाली आहे.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी आणि काँग्रेसशी काहीशा फटकून वागणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीलाच हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
एवढंच नव्हे तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची गळाभेटही घेतली होती. ही गळाभेट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस आणि टीएमसी पक्षात निर्माण झालेला दुरावा संपल्याचेच संकेत होते.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं विमान हवेतलं विमान आता जमिनीवर आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी आता ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी यांनी बॅनर्जी यांना त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्यासंदर्भातला प्रस्ताव दिल्याचा सूत्रांची माहिती आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात स्थापनेनंतरची सर्वात मोठी फूट पडल्याचं चित्र आहे.
आता सोनिया गांधी यांनी दिलेली तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची ऑफर ममता बॅनर्जी स्विकारणार का कळीचा मुद्दा आहे. ममता यांचा आजवरचा एकंदरीत स्वभाव पाहता सोनिया गांधींचा प्रस्ताव त्या कधीच मान्य करणार नसल्याचीच दाट शक्यता आहे.
ममता बॅनर्जी यांनी 1 जानेवारी 1198 रोजी 'अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस' (AITC) या राजकीय पक्षाची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी बाहेर पडून टीएमसी या नव्या पक्षाची स्थापना केली होती. आता पुन्हा त्याच काँग्रेस पक्षात टीएमसीचं विलिनीकरण करण्याची भूमिका त्या घेणार नाहीत.
ममता बॅनर्जी यांनी गेली 28 वर्ष प्रचंड संघर्षातून इथपर्यंत टीएमसी पक्षाची आणलेली वाटचाल आव्हानात्मक होती. यानंतर त्यांनी तीन टर्म अर्थात 15 वर्ष पश्चिम बंगालच्या सत्ता मिळवत तेथील स्थानिकच्या राजकारणात स्वत:चा दबदबाही निर्माण केला आहे. त्यांनी ज्या ज्यावेळी सत्ता मिळवली,ती एकहातीच.
या क्षणाला ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटल्याचं जरी चित्र असलं, तरी बंडखोर आमदार खासदारांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात उघड उघड भूमिका घेतलेली नाही. ममता यांचे भाचे व खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात बंडखोर आमदार व खासदार एकवटल्याचं चित्र आहे.
यामुळे ममता बॅनर्जी यांच्याशी आजही जोडले असल्याचा दावा ते सर्वजण करताना दिसून येतात. त्यामुळे भविष्यात टीएमसीनं बंडखोरांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतले तर चित्र वेगळंही दिसू शकतं. त्यामुळे ममता बॅनर्जी टीएमसीचं विलिनीकरण करुन त्यांचं राजकीय अस्तित्वच मिटवण्याचा धोका पत्करण्याची शक्यता नाही.
महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांसारखे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी त्यांच्या उरलेल्या पक्षासह त्यांचं अस्तित्व जपलं आहे. त्यांनी विलिनीकरणाचा मार्ग अद्यापही स्वीकारलेला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी या तडकाफडकी टीएमसी पक्षाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेणे शक्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.