शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनीही थेट `पुरावाच` पाठवला..

हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) कथित बंडखोरीच्या चर्चेने वैतागले
Hemant Patil
Hemant Patilsarkarnama
Published on
Updated on

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात जाणार, या चर्चेने जोर धरला आहे. राज्यभर विविध चर्चांना उधाण आले असून खासदारांकडे शंकेच्या नजरेने बघितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात आज घेतलेल्या बैठकीला सेनेचे काही खासदार अनुपस्थित असल्याच्या बातम्या दिवसभर प्रसारित झाल्या.

शिवसेनेचे जे खासदार उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मातोश्रीवर उपस्थित होते. पण ज्यांची नावे दांडी मारलेल्या खासदारांच्या यादीत जोडली गेली. या याद्या मग सोशल मिडियावर चांगल्याच फिरल्या. बैठक झाल्यानंतर अशा खासदारांनी आम्ही मातोश्रीवर बैठकीला उपस्थित होतो, असे सांगण्यासाठी ‘सरकारनामा’शी संपर्क साधला. याच यादीतील एक नागपूर जिल्ह्याच्या रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी बोर्डींग पासच ‘सरकारनामा’ला पाठवला. त्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी बैठकीच्या हजेरीपत्रकाची प्रत `सरकारनामा`ला पाठवली.

Hemant Patil
`मातोश्री`वरील बैठकीला दांडी? शिवसेना खासदार मंडलिकांचा मोठा खुलासा!

शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभा (तीन) असे मिळून 22 खासदार आहेत. त्यातील संजय मंडलिक हे दिल्लीला असल्याने येऊ शकले नाहीत. बंडू जाधव यांनी आजारी असल्याचे कळवले होते. दमणच्या खासदार डेलकर यांनी पक्षाला अनुपस्थितीबाबत कळविले होते. हिंगालीचे खासदार हेमंत पाटील हे उशिरा पोहोचले. त्यामुळे शिवसेनेच्या लेखी श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे दोनच खासदार अनुपस्थित असल्याची नोंद झाली आहे.

मात्र तोपर्य़ंत आज दिवसभर चर्चा होती ती, मातोश्रीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या खासदारांची. त्यामध्ये विदर्भातील तीन खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. तसे वृत्तही काही वाहिन्यांवरून प्रसारित झाले. पण यामध्ये सर्वाधिक चर्चेत होते ते विदर्भातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी. यांपैकी भावना गवळी खरोखरच अनुपस्थित होत्या. पण प्रसारित झालेले ते वृत्त खोटे, खोडसाळपणाचे होते, असे खासदार तुमाने आणि खासदार पाटील यांनी सांगितले.

Hemant Patil
खासदार तुमाने म्हणाले, माझ्या घरी काल बैठक झालीच नाही, काल नागपुरात होतो !

दिल्लीच्या निवासस्थानी खासदारांची झालेली तथाकथित बैठक आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत अनुपस्थित असल्याच्या अफवेने हेमंत पाटीलही चांगलेच चर्चेत होते. मात्र ते वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या बैठकीला उपस्थित होतो, असे सांगून हजेरी पत्रकावर सही केलेल्या पत्राचे प्रत त्यांनी पाठवली.

दोन दिवसांपूर्वी शिंदे समर्थक खासदारांची दिल्ली येथे कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी तुमाने नागपूरला होते. त्यामुळे बैठकीचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत आहेत. आपण शिंदे समर्थक असल्याचा अपप्रचार करीत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या यादीत हेमंत पाटील याचे नाव जोडले गेले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणाला समर्थन जाहीर करायचे याकरिता उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बैठक बोलावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com