Kolhapur ZP election : जिल्हा परिषद निवडणूक ही लाडक्या बहिणीच्या भरवशावर; महायुतीला सहकाराचा धोका!

Zilha Parishad Election 2025 News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीच्या भरवशावरच महायुती निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
Kolhapur Zp
Kolhapur Zp Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. या यशामागे लाडक्या बहिणींचा करिष्मा होता हे नव्याने सांगायला नको. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला भरभरून दिले. हा फॅक्टर चालल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीच्या भरवशावरच महायुती निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

राज्यातील खोळंबलेल्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लाडकी बहीण आपल्याला सावरेल, अशी आशा महायुती सरकारला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुतीच्या दहा जागा आल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही लाडक्या बहिणीचे आशीर्वाद मिळेल, असा दावा जिल्ह्यातील मंत्र्यांकडून केला जात आहे. पण गटातटात विभागलेले आणि सहकाराची मुळे खोलवर रुजलेल्या कोल्हापुरात या लाडक्या बहिणीला सहकार ब्रेक लावू शकतो, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

Kolhapur Zp
Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

राज्यातील महापालिका निवडणुकींबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांवर प्रशासकाचा कार्यकाळ सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कार्यभार प्रशासकांकडे आहे. येत्या 22 जानेवारीला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते, तशा भाजपकडून (BJP) हालचाली सुरू आहेत. तर महायुतीचे मंत्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकताना दिसत आहेत.

Kolhapur Zp
Saif Ali Khan Attacked:सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई अनसेफ? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण महत्त्वाची ठरल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत देखील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी नेते सज्ज झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी देखील लाडक्या बहिणीचे पैसे वाढवल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही लाडकी बहीण आपल्याला आशीर्वाद देईल, असा दावा केला आहे.

Kolhapur Zp
Saif Ali Khan Attack : सैफ अली खान हल्ला प्रकरणात 'या' एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्यांची हिस्ट्री

कोल्हापुरातील राजकीय आणि सहकारातील पार्श्वभूमी पाहिली तर गटातटाच्या राजकारणात कोल्हापूरचे राजकारण अवलंबून आहे. स्थानिक नेतृत्व आणि केलेल्या आघाड्या आणि नेत्यांच्या असलेल्या सहकारी संस्थेवरच ग्रामीण भागातील राजकारण अवलंबून आहे. राजकारण आणि सहकार ग्रामीण भागात एकमेकांवर अवलंबून असल्याने लाडक्या बहिणीचा प्रभाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चालणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

गावोगावी उभारलेल्या दूध संस्था, पतसंस्था, सहकारी संस्था याचा डोलाऱ्यामुळेच ग्रामीण भागातील सहकाराचा पाया मजबूत आहे. त्याला राजकारणाची जोड मिळाल्याने तो अधिकच मजबूत बनला आहे. पण महायुतीने लाडक्या बहिणीवर दाखवलेला भरोसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत टिकणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Kolhapur Zp
Saif Ali Khan Attacked:सैफवरील हल्ल्यानंतर मुंबई अनसेफ? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सध्याची कोल्हापूर जिल्हा परिषदेची परिस्थिती

राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांआतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी; तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती.

राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली. तर 2017 मध्ये जी मतदारसंघांची रचना होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्यामुळे आता 2017 प्रमाणेच जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची रचना ठेवून निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Zp
Saif Ali Khan Attacked : 'असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री, महाराष्ट्राचे दुर्दैव' ; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

भाजप-१४

काँग्रेस-१४

राष्ट्रवादी काँग्रेस-११

शिवसेना-१०

जनसुराज्य-६

ताराराणी पक्ष आघाडी-३

स्वाभिमानी शेतकरी संघटना-२

शाहू आघाडी (राधानगरी)-२

युवक क्रांती आघाडी-२

कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी-२

अपक्ष-१

Kolhapur Zp
Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com