Thackeray brothers alliance: ठाकरे बंधुंच्या युतीचा फायदा कोणाला? कोण ठरणार 'किंग मेकर'?

Mumbai civic polls News : महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडणुकीसाठी युतीची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे सर्वांचे तयारीकडे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray & Raj Thackeray
Uddhav Thackeray & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पाच दिवसाचा अवधी उरला असताना आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांनी एकत्रित येत मुंबई महापालिकेसाठी युतीची घोषणा केली आहे. युतीची घोषणा केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे, त्यातच आता महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडणुकीसाठी युतीची घोषणा अद्याप केलेली नाही. त्यामुळे सर्वांचे तयारीकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा फायदा कोणाला? कोण ठरणार 'किंग मेकर' याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात होत असलेलया मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काही दिवसापूर्वीच काँग्रेसने (Congress) स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ठाकरे बंधुंसोबत लढणार की काँग्रेससोबत जाणार याच निर्णय अद्याप घेतलेला नाही. यामुळे मविआतील तीन मित्र पक्ष मुंबईसाठी मात्र तीन वेगळ्या दिशेने गेले असल्याने ही निवडणूक महायुतीसाठी सोपी वाटत असली तरी त्या पाठीमागील गणित वेगळे आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Pune ShivSena : पुण्यात भाजप शिवसेनेला भाव देईना... नाराज कार्यकर्त्यांची रातोरात एकनाथ शिंदेंकडे धाव

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांच्यापुढील आव्हाने बरीच आहेत. 2017 च्या निकालानुसार, 27 टक्के व्होट शेअर भाजपचा होता. त्यावेळी शिवसेना (BJP) एकत्र होती आणि दोन्ही पक्षांची युती होती. राज ठाकरे यांचे 7.5 टक्के व्होट शेअर होते. त्याशिवाय, मनसेचा व्होट शेअर अनेक वर्षांपासून टिकून आहे. यामुळे शिवसेना दोन गट झाले असले तरी राज ठाकरेंचा व्होट शेअर त्यांच्याकडे वळू शकतो.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
ShivSena Vs BJP : भाजपला थोपवण्यासाठी सिंधुदुर्गचा पॅटर्न मराठवाड्यात राबवणार? युतीचे 12 वाजताच शिवसेनेकडून तिसरा प्लॅन अॅक्टिव्ह

मुंबईत 227 प्रभांगापैकी जवळपास 150 जागांवर मराठी मतांचा प्रभाव आजही आहे. त्यामुळे याठिकाणी काय होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यासोबतच काही ठिकाणी आता मुस्लीम मतदारही ठाकरेंकडे वळू शकतात, त्यामुळे त्याचा फायदा ठाकरे बंधूना होऊ शकतो, असे एका राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Congress-NCP Alliance: काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल! पण 'या' अटी पूर्ण झाल्या तरच अजित पवारांसोबत करणार आघाडी

केंद्रात राज्यात सत्ता असल्याने भाजप सध्या सर्वात प्रबळ आहे. मुंबईतली कामे मोठ्याप्रमाणात भाजपकडे आहेत. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजप पार अपयशी होईल, असे चित्र नाही पण मतांची ताटातूट होतू शकते. त्यामुळे येत्या काळात भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे.

येत्या काळात भावनिकतेच्या आधारावर केवळ ही निवडणूक जिंकता येईल, असे वाटत नाही. कारण मुंबई ही मराठी माणसाची आहे, शिवसेना रक्षणकर्ते आहेत, असे वाटत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व सुद्धा तसेच होते. परंतु विशेषतः जागतिकीकरणानंतर मुंबईतला मराठी समाज हा इतर समाजांत इतकाच आहे. म्हणजेच इतर समाजांसारखाच त्याचे स्थान झालेले आहे. शिवसेनेची ताकदही गेल्या काही काळात कमी झालेली आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

मराठी मते आता जेमतेम 28 टक्के राहिलेली आहेत. त्यातही फाटाफूट झालेली आहे. हिंदुत्वाकडे अनेक मराठी मतदार वळलेले आहेत.अशा परिस्थितीत मराठी मतदारामुळे हे एकत्र आलेत. किंवा त्यामुळे भावनिकता निर्माण व्हावी किंवा त्यांच्यापर्यंत भावनिक आवाहन पोहोचावे ही शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणाही उशिरा झाली असून आता हातात वेळही कमी उरला असल्याने मिळणाऱ्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Congress-NCP Alliance: काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल! पण 'या' अटी पूर्ण झाल्या तरच अजित पवारांसोबत करणार आघाडी

मुंबईतील मराठी बहुल मतदारसंघात ठाकरे बंधू एकत्र आल्याने निश्चित दोन्ही पक्षांना जिंकून येण्यासाठी वाव आहे. त्यांना त्याचा फायदाही होईल. परंतु उर्वरित मुंबईत जिथे मोठ्या संख्येने हिंदी भाषिक आहेत. किंवा जिथे हिंदी भाषिक निर्णायक आहे, अशा भागांत दोन्ही पक्षांची काय रणनिती आहे किंवा काय भूमिका आहे हे मात्र अस्पष्ट आहे. मुंबईतला मराठी मतदारही विभागला गेलेला आहे. शिवसेना, मनसे आणि आता तर शिवसेनेचे दोन गट शिवाय, भाजप यामध्ये विभागला गेला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची पारंपरिक मराठी मते वगळता युतीतली हिंदी भाषिक मते आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
NCP Ajit Pawar Sharad Pawar Alliance : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, पवारांचा शिलेदार म्हणतो, छे.. छे..! आमचं, 'मविआ'चं जुळलंय? आता महायुतीची खैर नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com