Solapur Congress : दुटप्पी भूमिका; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात सहभागी काँग्रेस नेत्याविरोधात ऊस उत्पादकांचा ‘ठिय्या’

Mahavikas Aghadi Agitation : म्हेत्रे यांच्या कारखान्याच्या विरोधात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या 29 दिवसांपासून उसबिलासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे कामही याच पक्षाच्या नेत्यांकडून होताना आज दिसून आले.
Congress Agitation
Congress AgitationSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 October : महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोलापुरात संग्राम मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हेही सहभागी झाले होते. मात्र, याच म्हेत्रे यांच्या कारखान्याच्या विरोधात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी गेल्या 29 दिवसांपासून उसबिलासाठी आंदोलन करत आहेत.

मात्र, एकीकडे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असताना दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे कामही याच पक्षाच्या नेत्यांकडून होताना आज दिसून आले.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी मातोश्री शुगर नावाने साखर कारखाना उभारला आहे. या कारखान्यात गाळप करण्यात आलेल्या उसाचे बिल 2700 रुपये एकरकमी देण्याचे ठरले होते. मात्र, उसाचे बिल न दिल्यामुळे मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उस बिलासाठी माजी मंत्री म्हेत्रे यांच्या घरासमोर जुलै महिन्यात आंदोलन केले होते.

जुलै महिन्यात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी मातोश्री साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने तीन ऑगस्टपर्यंत उसाचे बिल 2700 रुपये एकरकमी देण्याचे मान्य केले होते. मात्र, कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर 1850 रुपयेच जमा केले होते,

त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा काँग्रेस (Congress) भवनासमोर चार ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे 1850 रुपयांचा हप्ताही सर्व शेतकऱ्यांना न देता फक्त आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत

Congress Agitation
Solapur BJP : मातब्बर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज; हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील सुमारे 900 शेतकऱ्यांनी मातोश्री शुगर कारखान्याला ऊस घातला आहे. त्या गाळप केलेल्या उसाचे बिल मातोश्री साखर कारखाना प्रशासनाकडे थकीत आहे, त्यामुळे एकीकडे आंदोलनात सहभागी होताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे काँग्रेस नेत्याकडून स्पष्टपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे आज दिसून आले.

विशेष म्हणजे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत असताना अक्कलकोट मतदार संघातील मातोश्री शुगर कारखान्यात गाळप करण्यात आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय कधी मिळणार, याकडे संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे डोळे लागले आहेत.

Congress Agitation
Bhavana Gawali : भावना गवळींनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद ; ‘लोकसभेला सर्व्हेमुळे माझा बळी गेला...’

आंदोलनाच्या माध्यमातून एकीकडे शेतकऱ्यांविषी कळवळा असल्याचे दाखविणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com