Thackeray Brother : ठाकरे बंधूंच्या 'युती' आधीच राजकीय 'बॉम्ब'; महापौरपदावरून जोरदार रस्सीखेच !

Raj-uddhav thackeray News : मुंबईच्या महापौरपदावर युती होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावे केले जात असल्याने सध्या जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. दिवाळीनंतर निवडणुकीची घोषणा होणार असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे महायुती होणार असल्याची घोषणा सीएम फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे बंधू येत्या काळात एकत्र येण्याची शक्यता गृहीत धरली जात असून त्याची तयारी सध्या जोरात सुरु आहे. त्यातच आता मुंबईच्या महापौरपदावर युती होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावे केले जात असल्याने सध्या जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

मुंबई महापालिकेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच वेगवान तयारी सुरु करण्यात आली आहे. कोणाचा झेंडा फडकणार यावरून आता चढाओढ सुरू झाली आहे. मुंबईत महायुती विरूद्ध ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजू आपापला महापौर बसवण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Eknath Shinde VS BJP : एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार तक्रार! नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यानंतर दोन पक्षात हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसे व उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला होता. तर आता मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार असा विश्वास मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Shivsena Vs NCP : 'तटकरे हे रायगड अन् महाराष्ट्राला फसवणारे नेते', मित्रपक्षाच्याच आमदाराने राजकीय कुरघोड्यांचा पाढाच वाचला

संदीप देशपांडेंच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की," मनसे आणि शिवसेना ठाकरे एकत्र लढणार आहेत. अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक प्राण फुंकण्यासाठी, त्यांना जिद्दीने लढण्यास तयार करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता असा विश्वास देतो."

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Eknath Shinde : मिशन 'BMC': एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना 'कानमंत्र'; 'मेहनत करा, महापौर आपलाच!'

काही दिवसांपूर्वी भाजपच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, काहीही झाले तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काहीही झालं तरी मुंबईची महापौर हा मराठीच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार असे विधान संजय राऊत यांनी केले होते.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
Shivsena’s Dussehra Melava : बाळासाहेबांनी सुरू केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची अशी आहे परंपरा, इतिहासात फक्त एकदाच झाला नाही

दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईसाठी विशेष निर्णय घेतल्याचे शिंदेंनी अनेकदा सांगितले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा रविवारी मेळावा पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना करतानाच महापौर शिवसेनेचाच होणार अशी घोषणा केली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून भाजप महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहे, त्यातच शिंदेंच्या या विधानाने वातावरण चांगलेच तापले आहे.

Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg
BJP News: विधानसभेनंतर भाजपनं निवडणुकीचा पॅटर्न बदलला! कार्यकर्त्यांना दिलं नवं 'टार्गेट',चव्हाणांची फडणवीसांच्या 'होमग्राऊंड'मधूनच मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com