Thackeray brothers unity : ठाकरे बंधूंच्या हातमिळवणीने महायुतीने बदलले प्लॅनिंग; फडणवीस, शिंदेंची पानिपत टाळण्यासाठी नवी स्टॅटर्जी

Political News : ठाकरे बंधूंने केलेल्या या हातमिळवणीनंतर आता महायुतीला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे. एवढे दिवस एकत्र येणार नाहीत यासाठी प्लॅनिंग केले होते. मात्र, आता भाजप, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र येत वरळी येथील डोममध्ये विजयी मेळावा घेतला. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून शिवसैनिकाला ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यामुळे वरळी परिसरातील उत्साहच सर्व काही सांगून जात होता. गेल्या चार महिन्यापासून एकत्र येणार असल्याच्या चर्चाना पूर्णविराम देत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकारण 360 डिग्रीमध्ये बदलेले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, असे काही राजकीय पक्षांसह राजकीय धुरणींना वाटत होते. मात्र, राज व उद्धव ठाकरेंनी सर्वांचे अंदाज फेल ठरवले. त्यामुळे हे दोघेजण एकत्र येणार नाहीत, यासाठी प्लॅनिंग करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. ठाकरे बंधूंने केलेल्या या हातमिळवणीनंतर आता महायुतीला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे. एवढे दिवस एकत्र येणार नाहीत यासाठी प्लॅनिंग केले होते. मात्र, आता भाजप, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकीकडे तोंडावर आल्या आहेत. त्यातच मुंबई महापालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. बीएमसी निवडणुकीची यावेळेस भाजपने मोठी तयारी केली आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्लॅनिंग सुरु आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडील निम्म्यापेक्षा अधिक माजी नगरसेवकला गळाला लावले आहे. त्या जोरावरच भाजपकडे आता 100 माजी नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांचा आकडा देखील लवकरच 50 माजी नगरसेवकाचा होणार आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षाने एकत्र येत निवडणूक लढवली तर आकडा बहुमताच्या पुढे जाऊ शकतो, असे चित्र होते.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj uddhav thackeray : एक मेळावा, दोन ठाकरे अन् तीन प्रश्न! महाराष्ट्रातील जनतेला उत्तर कोण देणार?

त्यातच आता राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळे शिंदे गटाची ताकद कमी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसापासून भाजप, एकनाथ शिंदे यांनी त्यांची रणनीती बदलली आहे. विजयी मेळाव्यानंतर मुंबईतील चित्र बदलू शकते याचा अंदाज आला आहे. त्यामुळेच आता रणनीती बदलली आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Raj-Uddhav Thackeray Alliance : सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले म्हणणाऱ्यांना मनसेचे सणसणीत उत्तर, 'तो' फोटो दाखवला अन् गारच केले

मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव राजकारणातही एकत्र दिसणार का? आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार का? याची उत्सुकता लागली असली तरी या सर्वच प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळणार आहेत. त्यामुळे हे दोघे ठाकरे ब्रँड म्हणून एकत्र आले तर त्यांचा मुकाबला कोणत्या पद्धतीने करायचा याची स्टॅटर्जी ठरली आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
BJP Politics : नाशिकमध्ये मशालीची धग कमी केली, आता भाजपची नजर पंजावर ; तीन नेत्यांचा कमळाकडे कल

त्यानुसार भाजप व शिंदेंनी आता राज ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता राज ठाकरे यांना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून बोलले ते योग्य आहे, असे म्हणत त्यांचे कौतुक केलं जात आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरेंना या दोन बंधू एकत्र येण्याचा फायदा होऊ नये, यासाठी त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात एका भावाला गोंजारायचे तर दुसऱ्याला भावाला अंगावर घ्यायचे, अशी रणनीती भाजप, एकनाथ शिंदेंनी आखल्याचे दिसत आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
BJP Politics : नाशिकमध्ये मशालीची धग कमी केली, आता भाजपची नजर पंजावर ; तीन नेत्यांचा कमळाकडे कल

येत्या काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळे शिंदे गटाची ताकद, विशेषतः मुंबई आणि कोकणात, कमी होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास, भाजपला मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे. यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधू एकत्र येताच प्लॅन बदलला आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
BJP president : मोठी अपडेट; भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सहा नावे चर्चेत; राज्यातील 'या' बड्या नेत्याला मिळणार का संधी?

राज ठाकरे यांचे कौतुक करण्यामागे भाजपची दुसरी एक रणनीती अशी आहे की, त्यामुळे राज ठाकरे भाजप व एकनाथ शिंदेंवर तुटून पडणार नाहीत. त्याचा फायदा या दोन पक्षाला होईल तर दुसरीकडे मनसेचा जास्त फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या महापलिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Navi Mumbai मध्ये Ajit Pawar गट महायुतीतून बाहेर पडणार ? | Shivsena | NCP | BJP

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com