Kokate viral video : सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हिडीओ शूट केला कोणी? घर का भेदी लंका ढाये?

Maharashtra politics News : दररोज अंदाजे 8 शेतकरी आत्महत्या होत असलेल्या राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याची टीका केली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधिमंडळाच्या सभागृहात एकीकडे ऑनलाइन गेमिंगमुळे युवापिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याने यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे सभागृहातच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐन अधिवेशनात मोबाइलवर रमी खेळत असल्याने त्यांना धारेवर धरले जात आहे.

विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करून कोकाटेंवर आरोप केला आहे की दररोज अंदाजे 8 शेतकरी आत्महत्या होत असलेल्या राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याची टीका केली. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

पण प्रश्न असा आहे की, सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हिडीओ शूट केला कोणी?

विधिमंडळाच्या सभागृहातच राज्याचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. गेल्या काही दिवसात फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat), संजय राठोड, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, माजी मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे आजी-माजी मंत्री या-ना त्या कारणाने अडचणीत आले असतानाच आता त्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावाची भर पडली आहे.

Manikrao Kokate
Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला कोकाटेंनी या मधून बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, युट्यूबवरून खालच्या सभागृहाचे थेट प्रक्षेपण पाहत होतो आणि अचानक मोबाइलवर जंगली रमीची जाहिरात आली. ती स्कीप करीत असताना व्हिडिओ शूट झाला, असे सांगितले. पण सत्ताधारी बाकांवर बसणाऱ्या कोकाटेंचा व्हायरल झालेला व्हिडीओ शूट केला कोणी हा महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Manikrao Kokate
BJP Politics : ज्यांनी गद्दारी केली त्यांनाच 'रेड कार्पेट', जळगाव भाजपमध्ये नाराजीचं वादळ

कोकाटेंचा हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण राजकीय वर्तुळात असा अंदाज लावला जात आहे की, व्हिडीओ सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी (घरचा भेदी) शूट केला असावा. सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी विरोधातच तो व्हिडीओ बाहेर काढून गोंधळ निर्माण केला आहे. तर काहीजणांच्या मते, हा व्हिडीओ मुद्दाम राजकीय डावपेचाचा भाग म्हणून लीक करण्यात आला असू शकतो.

Manikrao Kokate
Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?
Manikrao Kokate
Raj-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत भाजपच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'एकत्र येणे...'

फ्रेममध्ये कोण दिसतय ?

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, हे सभागृहात बाकावर एकटे बसलेले आहेत. अशा प्रकारचे फुटेज सहसा विधिमंडळात उपस्थित असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते, किंवा पक्षातीलच एखादा असंतुष्ट आमदार शूट करतो, जेणेकरून ते एखाद्या गटाला राजकीय फायदा मिळवून देऊ शकतो.

Manikrao Kokate
Raj-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत भाजपच्या नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, 'एकत्र येणे...'

कॅमेरा अँगल :

हा व्हिडीओ वरून, डावीकडून उजवीकडे शूट केला आहे. हे स्पष्ट सुचवते की व्हिडीओ सभागृहातच कुणीतरी, बहुधा समोरच्या बाकावरून शूट केला आहे. म्हणजेच घर का भेदी ही म्हण लागू होणारी शक्यता प्रबळ आहे. सत्ताधारी पक्षातीलच कोणी तरी हा व्हिडीओ शूट केला, असावा अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Manikrao Kokate
Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?

मोबाईल स्क्रीन :

स्क्रीनवर गेम सारखी इंटरफेस दिसते. वळणारे पत्ते, "Play now" बटण यातून रमी/सोलिटेयर/जंगली रमी यातील एखाद्या गेमचा स्क्रीनशॉट असण्याची शक्यता आहे.

बॉडी लँग्वेज :

कोकाटेंनी मोबाइलकडे वारंवार बघणे, त्यावर ‘स्वाइप’ किंवा ‘टच’ करणे हे ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट सूचित करतात. म्हणजे हे फक्त जाहिरात न वाटता, सहभागीपणे वापरलेले मोबाइल ऍप असू शकते.

Manikrao Kokate
NCP News : कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी; सुनील तटकरेंसमोर छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते भिरकावले! लातूरमध्ये राडा..

कोणते क्षण एडिट झाले आहेत का?

व्हिडीओ 'Zoom' आणि 'Focus' करून सोशल मीडियावर सादर झाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचार करण्याच्या हेतूने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कोणीतरी मुद्दाम शूट केला असल्याचे दिसत आहे.

Manikrao Kokate
Suraj Chavan : 'छावा'च्या प्रदेशाध्यांना मारहाणीचे सूरज चव्हाणांनी दुसरेच कारण सांगितले; म्हणाले, 'सुसंस्कृत नेत्याचा वारसा...'

संजय शिरसाटांच्या व्हिडीओमागेही घरभेदी

आठवडाभरापूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत आणि या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. तरीपण हा व्हिडीओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावेळीही हे शूट करण्यामागे कोणी तरी घरभेदी सहभागी असल्याचे समोर आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com