Devendra Fadnavis On Dhananjay Munde: विरोधात असताना ठाकरेंच्या तीन-तीन मंत्र्यांचे राजीनामे घेणाऱ्या फडणवीसांची मुंडेंबाबत टोलवाटोलवी का..?

CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde Resign : पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत पुराव्यावर पुरावे देत अनिल देशमुख,संजय राठोड, नवाब मलिकांचा राजीनामा घेतला होता. पण आता धनंजय मुंडेचे वाल्मिक कराड कनेक्शनचे अनेक पुरावे,अंजली दमानिया यांचे कृषिखात्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही आता मुख्यमंत्रिपदासह गृहखातं हातात असलेल्या फडणवीसांना राजीनाम्यासाठी आणखी कुठले पुरावे हवे आहेत, अशी विचारणा होत आहे.
Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक खणखणीत नाणं. भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या फडणवीसांची ही मुख्यमंत्रिपदाची ही तिसरी टर्म आहे. पण त्यांनी आक्रमक विरोधी पक्षनेता ही भूमिका निभावताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला 'सळो की पळो' करुन सोडले होते. याच फडणवीसांनी तीन तीन मंत्र्‍याचा राजीनामा घेण्याची वेळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणली होती. पण त्याच धाडसी फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्‍यावर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून गंभीर आरोप केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पारदर्शक कारभारावरच विरोधकांकडून शिंतोडे उडवले जात आहे.

बीडमधील हत्येप्रकरण आणि 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक आणि मकोका कारवाई केल्या गेलेल्या वाल्मिक कराडशी संबंधी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे व्यावहारिक कनेक्शनचे आरोप, कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे ते सध्या प्रचंड अडचणीत आले आहेत. दिवसागणिक राजीनाम्याची मागणी वाढत असताना तरीही धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्यावरुन गेले 68 दिवस फक्त टोलवाटोलवी सुरू आहे.

सत्ताधारी कितीही स्ट्राँग असला तरी त्यांच्यावर तुटुन पडण्याची उत्तम हातोटी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतानाच आपल्या कुशल नेतृत्व,पक्षसंघटनेवरची पकड,प्रशासनावरचा वचक,अभ्यासूवृत्ती यांची लक्षणीय चुणुक दाखवतानाच आपली राजकीय प्रतिमा अधिकोत्तम पध्दतीनं उंचीवर नेली.

Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
BJP News : उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा लढलेल्या पराभूत उमेदवारांची भाजपमध्ये घरवापसी!

2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरल्यानंतरही विरोधी बाकावर बसावं लागलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून सभागृह तर गाजवलंच शिवाय सत्ताधारी उद्धव ठाकरेंच्या सरकारला जेरीस आणलं. त्यांनी ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील तीन दिग्गज नेत्यांचा राजीनामाही घेतला. पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत पुराव्यावर पुरावे देत अनिल देशमुख,संजय राठोड, नवाब मलिकांचा राजीनामा घेतला होता.

पण आता धनंजय मुंडे- वाल्मिक कराड कनेक्शनचे अनेक पुरावे,अंजली दमानिया यांचे कृषिखात्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही आता मुख्यमंत्रिपदासह गृहखातं हातात असलेल्या फडणवीसांना राजीनाम्यासाठी आणखी कुठले पुरावे हवे आहेत, अशी विचारणा होत आहे. धाडसी निर्णय घेण्यासाठी कुठलाही मागचा पुढचा विचार न करणारे फडणवीसांना सध्याच्या महायुती सरकारमध्ये विशेषत: संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेल्या धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय घेताना कोणती अदृश्य शक्ती मागे खेचत आहे असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
Mahayuti Politcs : महायुतीत ताणाताणी, 'स्थानिक' पूर्वी तुटण्याचीच अधिक शक्यता; चंद्रकांत पाटील नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेवर संतापले

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता होते. त्यांनी या काळात आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपची संपूर्ण यंत्रणा गल्ली ते मंत्रालयापर्यंत कामाला लावली. त्याचबरोबर अभ्यासू आणि प्रशासनावरच्या मजबूत पकडीचं दर्शन घडवातानाच विरोधी पक्षनेतेपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी एकापाठोपाठ एक प्रकरणं बाहेर काढतानाच सरकारवर कात्रीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही.

याचकाळात पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण चांगलंच गाजलं. या प्रकरणात तत्कालीन शिवसेनेचे मंत्री आणि नेते संजय राठोड यांचं नाव पुढं आल्यानं विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी चित्रा वाघ यांच्यासारख्या महिला नेत्याला मैदानात उतरवत हे प्रकरण कायम तापतं तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकरांनीही दुसर्‍या बाजूनं खिंड लढवत या प्रकरणाची धग कमी होऊ दिली नाही. सतत राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड दबाव आणला. आणि अखेरीस संजय राठोडांना त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायलाच भाग पाडलं.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याआधी मनी लाँड्रिंग प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीनं अटक केली होती.

Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
Saroj Ahire : महायुतीत नाराजी नाट्य? अजितदादांच्या आमदाराने भर स्टेजवर व्यक्त केली खदखद, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

यावेळी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे,त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे,हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.त्यावेळी नवाब मलिकांनाही राजीनामा द्यावा लागला होता. या तीनही प्रकरणात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक रोल निर्णायक ठरला होता. यावेळी फडणवीसांनी आरोपांची राळ उठवतानाच ठाकरे सरकारची इमेज राज्यात डॅमेज करण्यातही यशस्वी ठरले होते. त्याचमुळे उद्धव ठाकरेंवर त्यांच्या तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की ओढावली.

आता महाराष्ट्रात प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या आणि पारदर्शक कारभार, कडक शिस्त, धाडसी निर्णयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेल्या धनंजय मुंडेंबाबत निर्णय घेण्यात कचखाऊ भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. बीड हत्या प्रकरण लावून धरलेले आमदार हे भाजपचेच आहे. आणि त्यांनी अधिवेशन काळात सभागृहात केलेले आरोप,धक्कादायक गोष्टी नंतर तपास यंत्रणांच्या तपासातही समोर आल्या होत्या.

Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
Ajit Pawar On Munde Resign : मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत अजितदादांचा धनंजय मुंडेंना सूचक इशारा; म्हणाले, ते तर काय हे बघत नाहीत का’?

या प्रकरणात ज्यांच्यांशी व्यावहारिक संबंध आहेत अशा वाल्मिक कराडसह एकूण आठ जण अटकेत असून मकोका कायद्यांतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. यानंतर बीड हत्याप्रकरणासह कृषिमंत्री असताना धनंजय मुंडेंच्या काळातील भ्रष्टाचारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदा घेत आणि पुरावे सादर करत गंभीर आरोप केले आहेत. ते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना प्रत्यक्ष भेटूनही दिले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाला तब्बल 68 दिवस उलटूनही याप्रकरणात राजीनामा कुणी घ्यावा यावरुन टोलवाटोलवी सुरू आहे.

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या राजीनाम्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घ्यावा असं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा प्रकरणावर भाष्य करताना हा आमच्या पक्षाचा निर्णय नसून तो अजित पवारांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यावर तेच अंतिम निर्णय घेतील असं स्पष्ट केलं होतं.

यानंतर अजितदादांनी जोपर्यंत मुंडेंवरचे आरोप सिध्द होत नाही तोपर्यंत राजीनाम्याची कारवाई केली जाणार नाही असे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.यानंतर आता ते म्हणतात, की माझ्यावर ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता.आता राजीनाम्याबाबत धनंजय मुंडेंनीच ठरवावं असं उत्तर देत पुन्हा राजीनाम्याचा चेंडू मुंडेंकडे ढकलला.त्यामुळे सध्यातरी धनंजय मुंडे स्वत: हून राजीनामा देतील याची सूतराम शक्यता नाही.

Devendra Fadnavis dhananjay munde ajit pawar .jpg
Devendra Fadnavis News : धस-मुंडे भेटीने काही फरक पडत नाही, बीड हत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतली आहे!

पण मुख्यमंत्री हा राज्याचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. त्यांच्यावर मंत्र्‍यावर आरोप केले जात आहे. प्रचंड बहुमत असतानाही फडणवीसांवर राजीनाम्यावरुन अजित पवारांचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा की धनंजय मुंडे यांचा दबाव आहे यावरुन राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.पण एक नक्की की जे कणखर देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या पहिल्याच टर्मला दोन वर्ष पूर्ण होत नाही तोवरच एकनाथ खडसेंसारख्या मुत्सद्दी राजकीय नेत्याचा,मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतात,त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं फार अवघड नाही. पण अशी कुठली अदृश्य शक्ती आहे, जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मागे खेचत आहे असा सवाल राजकीय विश्लेषकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com