MLC Election : झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी का मिळाली? 'ही' आहेत 5 मोठी कारणं

Zeeshan Siddique NCP MLC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे मुंबईतील नेत्यांना ताकद देत पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा करून घेणे ही पक्षाची रणनीती असल्याचे दिसून येते.
Zeeshan Siddique
Zeeshan SiddiqueSarkarnama
Published on
Updated on

Zeeshan Siddique News : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः मुंबईतील राजकीय समीकरणे, पक्षाची आगामी रणनीती आणि सामाजिक प्रतिनिधित्व या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

मिशन मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे मुंबईतील नेत्यांना ताकद देत पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा करून घेणे ही पक्षाची रणनीती असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत मुंबईत पक्षाची पकड मजबूत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या चेहऱ्याला पुढे आणणे आवश्यक ठरते. झिशान सिद्दीकी हे मुंबईतील राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे नाव आहे. त्यांना आमदारकीचा अनुभव देखील आहे. त्यामुळे मिशन मुंबईसाठी झिशान हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे ठरणार आहेत.

युवा चेहरा

झिशान सिद्दीकी यांची प्रतिमा तरुण, आक्रमक नेत्याची आहे. त्यामुळे पक्षाला युवा मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्यास मदत होऊ शकते. युवा नेतृत्वाला संधी देण्याचा संदेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला बदलत्या राजकीय प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मानले जात आहे.

Zeeshan Siddique
MLC Election : 'आमदरकी'साठी बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश, 'प्रहार'बाबत घेतला मोठा निर्णय

मुस्लीम चेहरा

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण महत्त्वाचे आहे. विविध निवडणुकांमध्ये या मतदारसंघाचा प्रभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत मुस्लीम समाजातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने या समाजघटकाला राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

आमदारकीचा अनुभव

कमी वयात राजकारणात प्रवेश करून झिशान सिद्दीकी यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 27 व्या वर्षी ते आमदार झाले. त्यांचे वडील बाबा सिद्धीकी हे काँग्रेसचे बडे नेते होते. आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांच्या मर्जीतील नेते होते. दरम्यान, बदलत्या राजकीय समीकरणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या नेतृत्वात काम केल्यामुळे संघटनात्मक अनुभवही त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. निवडणुकीतील रणनीती, स्थानिक संपर्क आणि पक्ष संघटना याबाबतची समज त्यांना लाभलेली आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार

निवडणुकांमध्ये प्रचार, संपर्क मोहीम आणि संघटनात्मक खर्च यासाठी आर्थिक क्षमता महत्त्वाची असते. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, संसाधनांची उपलब्धता असलेले उमेदवार पक्षासाठी दीर्घकालीन राजकीय गुंतवणूक ठरू शकतात. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीत आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार हा पैलूदेखील महत्त्वाचा मानला जात आहे.

त्यामुळे झिशान यांच्या उमेदवारीचा निर्णय केवळ एका उमेदवाराची निवड नसून मुंबईतील राजकीय विस्तार, सामाजिक संतुलन, युवा नेतृत्व आणि भविष्यातील निवडणूक रणनीती यांचा एकत्रित विचार असल्याचे दिसते आहे.

Zeeshan Siddique
NCP Candidate : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर, 'या' नेत्यावर सुनेत्रा पवारांचा विश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com