Dombiwali News : उद्धव ठाकरे यांनी हाताच्या पंजाला मतदान करणार असल्याचे जाहीर बोलले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले आहे. एक ठाकरे हे धनुष्यबाणला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत. इतकी वर्षे बाळासाहेब ठाकरे, सावरकर आणि हिंदुत्ववाचे नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांचे विचार आज शिल्लक सेनेने आणि त्यांच्या प्रमुखाने विकले, अस सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विविध घटक पक्षांचे मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेना टोला लगावला आहॆ.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं. आज त्यांना जे अनेक वर्षे पाहिजे होतं, ते त्यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं. काँग्रेस सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात...
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा आहे. आम्हाला अभिमान आहे, हिंदुत्व बरोबर उभे राहिलो आम्ही बाळासाहेबांचा विचार बरोबर उभे राहिलो. आम्ही सावरकरांच्या विचारांबाबत उभा राहिलो. म्हणून जो आहे धनुष्यबाण आणि शिवसेना जे आहे एकच सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे.
डोंबिवली मनसेचा शिंदेंसाठी मेळावा...
डोंबिवलीमध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. तर राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.