EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mumbai BMC election: महायुतीत 'छुपं युद्ध' पेटलं! भाजपच्या अमराठी उमेदवारांना रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा 'मास्टरप्लॅन'?

BJP non-Marathi candidates News : भाजपच्या अमराठी उमेदवारांना रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने 'मास्टरप्लॅन' तयार केला असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीची तयारी महायुती व ठाकरे बंधूनी केली आहे. प्रचाराची रणधुमाळी रंगली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी व अमराठी मुद्यावरच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यातच पडद्याआड छुप्या हालचाली सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या अमराठी उमेदवाराविरोधात छुप्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपने मुंबईत 139 जागा लढवताना अवघ्या 42 मराठी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळेच भाजप हा मराठी विरोधी असल्याचा ठपका बसत असतानाच दुसरीकडे भाजपच्या अमराठी उमेदवारांना रोखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने 'मास्टरप्लॅन' तयार केला असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. महायुतीने एकीकडे प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र असले तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीमधील मित्रपक्षच एकमेकांना संपवण्याचे प्लॅनिंग करीत आहेत. मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकवण्यासाठी आणि 'बार्गेनिंग पॉवर' टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या अमराठी उमेदवारांविरोधात छुप्या हालचाली सुरू केल्याचे समजते.

भाजपने मुंबईत 139 जागा लढवताना अवघ्या 42 मराठी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. यामुळेच भाजप बॅकफूटवर दिसत आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या शिवसेनेने या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे. भाजपच्या (BJP) या अमराठी चेहऱ्यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेने मराठी उमेदवारांना ताकद देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपचे अमराठी उमेदवार आहेत, त्याठिकाणी समोर असलेल्या मराठी उमेदवाराला, मग तो अपक्ष असो वा मनसे अथवा ठाकरे यांच्या शिवसेनेचा, त्याला छुप्या पद्धतीने रसद पुरवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला 227 पैकी अवघ्या 90 जागा आल्या आहेत. जर भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले, तर महापालिकेत शिवसेना दुय्यम ठरणार आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौरपदावर भाजपचा दावा असणार आहे. त्यामुळे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेची द्विधा अवस्थ झाली आहे. त्यामुळेच आता शिंदे यांच्या शिवसेनेने वेगळी रणनीती आखली आहे. यामध्ये भाजपचे नगरसेवक कमी करून त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे प्लॅनींग केले जात आहे. स्वबळावर महापौर बसवता आला नाही, तर किमान 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहून बार्गेनिंग पॉवर वाढविण्यावर भर असणार आहे. महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद मुंबईत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

'भाजप विरुद्ध शिंदे सेना' छुपा संघर्ष

मुंबई महापालिकेत शिवसेनेची पकड मजबूत झाल्यापासून आतापर्यंत शिवसेनेचाच महापौर बसत आला आहे. शिवसेना फुटीनंतर ही परंपरा खंडित झाल्यास शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. त्यामुळेच भाजपचे 90 हून अधिक नगरसेवक येण्याऐवजी शिंदेंच्या आमदारांनी आणि खासदारांनी आपापल्या क्षेत्रात भाजपच्या उमेदवारांची कोंडी करण्याची 'फिल्डिंग' लावल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच, मुंबई महापालिकेची ही लढाई आता 'महायुती विरुद्ध महाविकास आघाडी' न राहता 'भाजप विरुद्ध शिंदे सेना' अशा छुप्या संघर्षात रूपांतरित झाली आहे. त्यामुळे 16 जानेवारीच्या मतमोजणीत या छुप्या मदतीचा परिणाम कोणावर होतो, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यात शीतयुद्ध

महायुतीमधील वरिष्ठ नेते एकत्र दिसत असले तरी प्रभाग स्तरावर मात्र चित्र वेगळे दिसत आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शीतयुद्ध पाहवयास मिळत आहे. अनेक प्रभागांत भाजपच्या अमराठी उमेदवारांविरोधात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी छुपी बंडखोरी करत आहेत. त्यात भाजपचे काही लक्षवेधी अमराठी उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर शिंदे शिवसेनेकडून आव्हान उभी केले जात आहे.

वेगळे चित्र दिसण्याची शक्यता

भाजपच्या अमराठी उमेदवाराला पाडण्यासाठी शिंदे सेनेने प्रसंगी ठाकरे यांच्या शिवसेनेसह, मनसेच्या मराठी उमेदवारालाही मदत करीत असल्याचे चित्र आहे. 'आधी मराठी आणि बाळासाहेबांचा विचार' असा भावनिक आधार घेत कार्यकर्त्यांना अमराठी उमेदवारांचा प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT