Thane NCP News : पुण्यातील अपघात प्रकरणावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ‘राज्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडली की त्यांचा संबंध आव्हाड नेहमीच अजितदादांशी जोडतात. अजितदादांवर खोटी टीका करण्याची आव्हाड यांना सवय असून स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून अशी त्यांची प्रवृत्ती आहे, त्यामुळे त्यांनी अजितदादांवर टीका करण टाळावं,’ असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.
पुण्यातील अपघातावरुन (Pune Accident) सध्या राजकीय शीतयुद्ध रंगले आहे. महायुतीच्या नेत्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निशाणा लावला आहे. या अपघातावरुन शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. आव्हाडांच्या या टीकेला आनंद परांजपे यांनी उत्तर दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परांजपे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांनी पुण्याच्या अपघात प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, हीच भूमिका घेतली आहे. त्यानुसार या प्रकरणांतील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु विरोधी पक्षातील शरदचंद्र पवार गटातील नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे राज्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडली की त्यांचा संबंध अजितदादांशी जोडतात.
अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत पुण्याच्या पोलिस आयुक्तांना स्पष्ट सूचना करताना कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. दोषींवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जरा आठवावे की, त्यांच्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला, तेव्हा अजितदादांनीच ठाणे पोलिस आयुक्तांना मदतीसाठी कॉल केला होता.
अजितदादांवर खोटी टीका करण्याची आव्हाड यांची नेहमीची सवय आहे. ‘स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच पहायचे वाकून’ ही आव्हाड यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका करण टाळावं, असे आवाहन परांजपे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.