Aniket Javalkar-Hemant Dabhekar-Shrikant Shinde Sarkarnama
पुणे

Yuva Sena News': श्रीकांत शिंदेंनी झटक्यात न्याय केला; गुंड दाभेकरच्या ‘हजेरी’ची अनिकेतला शिक्षा...

Sudesh Mitkar

Pune News : ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेने आधीच तणावात असलेल्या खासदार श्रीकांत शिंदेंचे त्यांच्याच पक्षातील विशेष करून युवा सेनेच्या अनिकेत जावळकरांनी ‘टेन्शन’ वाढविले. डॉ. श्रीकांत यांच्या ‘बर्थ डे’ सेलिब्रेशनसाठी कुख्यात गुंड हेमंत दाभेकरला नेऊन ‘ताकद’ दाखविण्याच्या नादात अनिकेतला पदच गमवावे लागले. डॉ. श्रीकांत यांच्यासमवेत अनिकेत आणि गुंड दाभेकरचा फोटो व्हायरला होताच, सोशल मीडियात धुमाकूळ माजला आणि दाभेकरच्या ‘हजेरी’वरून अनिकेतला ‘शिक्षा’ ठोठाविण्याचा पवित्रा युवा सेनेच्या नेतृत्वाने घेतला. या फोटोवरून राजकारण तापण्याची शक्यता गृहीत धरून डॉ. श्रीकांत यांनी एका झटक्यातच अनिकेतला युवा सेनेच्या पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. (Aniket Javalkar sacked from post of Yuva Sena's Western Maharashtra Inspector)

अनिकेत जावळकर यांना युवा सेनेतील पश्‍चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक पदावर पाणी सोडावे लागले. राजकारणात बारकावे जाणून असलेल्या डॉ. श्रीकांत यांनी कार्यककर्त्याचे लाड खूपवून न घेण्याचा ‘मेसेज’ युवा सेनेत धाडला. गंमत म्हणजे, हा फोटो मीडियाचे प्रतिनिधी आणि सोशल मीडियांमध्ये पसरवरून डॉ. श्रीकांत यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतील काही मंडळींनी अनिकेतला हिसका दाखविल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे, भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी या फोटोवर फोकस केल्याचे दिसत आहे. या साऱ्या राजकारणाला त्याच भाषेत उत्तर देत, श्रीकांत यांनी अनिकेत जावळकर यांना धडा शिकवला असला; तरी अनिकेतच्या अडून, एकप्रकारे डॉ. श्रीकांत यांच्या युवा सेनेला बदनाम करण्यात त्यांचेच पदाधिकारी असल्याचेही बोलले जाते आहे. त्यामुळे युवा सेनेत असा ‘गेम’कोणी केला, ती व्यक्ती कोण, याची उत्सुकता आहे.

हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळसोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामीनावर बाहेर असून, शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा मानला जात होता. यातच त्याने वर्षा येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण आणि गुंडगिरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

मागील महिन्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा जवळच्या साथीदाराने गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर पुण्यात अतिशय दहशतीचे वातावरण पसरलं होत. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजानन मारणे याने सहकुटुंब भेट घेतली. या भेटीचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत ‘अशा प्रकारच्या भेटी आपण टाळल्या पाहिजेत,’ अस ठणकावून सांगितले. मात्र, पक्षनेते, गुंड आणि त्यांचे पक्षप्रवेश राज्यात एक समीकरणच बनत चालले आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ हा भाजपमध्ये सक्रियपणे काम करत होता. गुंड गजानन मारणे यांच्या पत्नीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून त्या नगरसेविका होत्या. आता गुंड हेमंत दाभेकर याने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहे हेमंत दाभेकर?

शरद मोहोळचा साथीदार आलेला हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणेच्या खून प्रकरणात शरद मोहोळसोबत शिक्षा भोगत होता. याशिवाय त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत.

Edited by : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT