Kasaba By-Election : दवे, दाभेकर, कुंभारांनी शड्डु ठोकले; आज अर्ज भरणार

भाजप, महाविकास आघाडी यांच्यातील चढाओढीत आम आदमी पार्टी आणि हिंदू महासंघानेही उडी घेतल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे.
Kasaba By-Election
Kasaba By-Election Sarkarnama
Published on
Updated on

Kasaba By-Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसेभेच्या पोटनिवडणुका वेगळ्या वळणावर पोहचल्या आहेत. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडी यांच्यातील चढाओढीत आम आदमी पार्टी आणि हिंदू महासंघानेही उडी घेतल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे.

कसब्यात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमधून इच्छुकांची यादी मोठी होती. त्यात काँग्रेसचे जुने सभासद बाळासाहेब दाभेकर इच्छुक होते. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दाभेकर यांनीदेखील काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे. दाभेकरदेखील आज (७ फेब्रुवारी) ते अर्ज दाखल करणार आहेत.

Kasaba By-Election
Kasaba By-Election : कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यासाठी भाजपाने पुनर्विचार करावा; आनंद दवेंची मागणी

दरम्यान, चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा मानस होता. पण विरोधी पक्षांनी साथ न दिल्यामुळे याठिकाणी निवडणुकांमधील चुरस वाढली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपसह महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यातच कसब्याच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानेही उडी घेतली आहे.

कडूनही कसबा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी (०६ फेब्रुवारी ) कसबा पोटनिवडणुकीसाठी आपकडून (AAP) सात जण इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या होत्या. या उमेदवारांमध्ये विजय कुंभार, श्रीकांत आचार्य, किरण कद्रे, आनंद अंकुश, घनशाम मारणे, सुनीता काळे, सीमा गुट्टे यांचा समावेश होता. आता त्यातील विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी कसबा निवडणूक कार्यालयातून अर्ज घेतला आहे. कुंभार हेदेखील आज (७ फेब्रुवारी) अर्ज दाखल करणार आहेत.

यासोबतच, हिंदू महासंघही या निवडणुकीसाठी अॅक्टिव्ह झाला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र कसब्यात ब्राम्हणेत्तर उमेदवार दिल्याने हिंदू महासभेनंही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदू महासभेनं एक निवेदन जारी करत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. हिंदू महासभेचे अध्य़क्ष आनंद दवे हे स्वत: कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com