Sanjana Jadhav, Dharmraobaba Atram, pratap chikhlikar, Sandip Kshirsagar  Sarkarnama
विशेष

Assembly Election News 2024 : राज्यातील नातेवाईकांच्या चुरशीच्या लढतीमध्ये मारली बाजी; ही मंडळी झाली विजयी

Political News : या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडीत मोठा संघर्ष पाहवयास मिळाला. त्यामुळे अनेक हायहोल्टेज लढतीमुळे ही निवडणूक रंगतदार ठरली.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात नातलग एकमेकांविरोधात उभे टाकले होते. त्यामुळे अशा या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडीत मोठा संघर्ष पाहवयास मिळाला. त्यामुळे अनेक हायहोल्टेज लढतीमुळे ही निवडणूक रंगतदार ठरली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Assembly Election News 2024 )

यावेळेस अहेरीमध्ये बाप-लेक, बारामतीमध्ये चुलते-पुतणे तर कन्नडमध्ये पती-पत्नी तर पुसदमध्ये सख्खे भाऊ, बीडमध्ये चुलत भाऊ, तर लोहा-कंधार मतदारसंघात बहीण-भाऊ, पाचोरा मतदारसंघात चुलत-बहीण भाऊ आमने-सामने आले होते. नातलगातील या लढतीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे राज्यातील नातेवाईकांच्या या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अहेरीतील लढतीत वडिलांची बाजी

अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामध्ये लढत झाली. त्याशिवाय अपक्ष म्हणून त्यांचे पुतणे अंबरीश आत्राम निवडणूक रिंगणात उतरले होते. या लढतीत धर्मराव बाबांच्या कन्येने बंड करीत असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे या लढतीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. त्यांनी कन्या व पुतण्याचा पराभव केला.

चोपडा मतदारसंघात भावाची बाजी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून त्यांच्या चुलत भगिनी वैशाली सूर्यवंशी मैदानात उतरल्या होत्या. या लढतीत आमदार किशोर पाटील यांनी बाजी मारली त्यांनी भगिनी वैशाली सूर्यवंशी यांचा 38 हजार 689 मताने पराभव केला. या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेल्या अमोल शिंदे यांनी जवळपास ५८ हजार मते घेतली. या ठिकाणी मताचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाले.

लोहा-कंधारमध्ये भावाने केला बहिणीचा पराभव

नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदार संघात झालेल्या बहीण-भावातील लढतीत भावाने बाजी मारली. माजी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात त्यांच्या भगिनी आशा शिंदे या शेकापकडून रिंगणात उतरल्या होत्या. त्या माजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. या निवडणुकीत आशा शिंदे पराभूत झाल्या आहेत. प्रताप चिखलीकर यांनी याठिकाणी बाजी मारली

बारामतीमध्ये चुलत्याने मारली बाजी

बारामती मतदारसंघात होत असलेल्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या चुलते-पुतण्यातील लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली. त्यांनी पुतणे युगेंद्र पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

कन्नडमध्ये पत्नी विजयी

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून संजना जाधव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पती व माजी आमदार हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पती-पत्नीमध्ये होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या लढतीत संजना जाधव विजयी झाल्या आहेत. संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या होत. या मतदारसंघातून त्यांनी गेल्यावेळेसचे शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला.

बीडमध्ये चुलत भावाची लढत

बीडमधील दोन भावांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात पहिल्यांदाच क्षीरसागर कुटुंबातील दोन चुलत भाऊ एकमेकाविरोधात उभे टाकले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढत होते. या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर आमदार झाले आहेत. यावेळेस चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी दोन पुतण्याच्या लढतीमुळे निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT