Amit Shah-Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Amit Shah : अमित शाहांचा एकाच वाक्यातून शिंदे-अजितदादांना इशारा : राज्यातील सत्तेसह स्थानिकच्या निवडणुकीचीही धास्ती

Maharashtra politics News : भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमीपूजनानिमित्त मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा एकाच वाक्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना इशारा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यातच भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे भूमीपूजनानिमित्त मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा एकाच वाक्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना इशारा दिला आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या भाजपच्या सर्व नेत्यांना अमित शहांनी कानमंत्र दिला आहे. येत्या काळात भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे विधान त्यांनी केल्याने महायुतीमधील मित्रपक्षांत अस्वस्थता पसरली आहे. मुंबईतील भाषणातून अमित शाहांनी मित्रपक्षांना सूचक इशारा दिला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात भाजप (BJP) कुणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यासोबतच झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका व झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करा, दुर्बिनीतूनही विरोधक कुठे दिसायला नको असा कानमंत्र शाहांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबईतील भाषणातून अमित शाहांनी मित्रपक्षांना हा सूचक इशारा दिला आहे.

भाजप पक्ष देशभरात प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वावर उभा आहे. प्रत्येक ठिकाणी राजकीय अस्तित्व दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. राज्यात आपल्याला येत्या काळात डबल इंजिन सरकार नाही तर ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका व झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका व महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करीत आहे की, या निवडणुका पूर्ण ताकदीने लढून विरोधकांचा सुफडा साफ करा, दुर्बिनीतूनही विरोधक कुठे दिसायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचवेळी दुसरीकडे अमित शाह (Amit Shah) यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याविषयी कसलेच भाष्य केले नाही. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षासाठी सूचक इशारा मानला जात आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे

येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच भाजप केवळ स्वबळावर लढेल असे नाही तर त्यांनी २०२९ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता हवी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील असलेल्या सत्तेसह स्थानिकच्या निवडणुकीचीही धास्ती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना लागली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून लढल्या होत्या. त्यावेळी दोन्ही निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षाला घवघवीत यश मिळवले होते. मात्र, येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला मुंबई महापालिका वगळता कुठेच भाजपला मित्रपक्षाची गरज राहिलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसापूर्वीच मुंबई महापालिका वगळता अन्य ठिकाणी महायुतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इतरत्र महायुती होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे गरज पडली तर काही ठिकाणी तीन पक्ष स्वबळावर लढून सत्तेसाठी एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच अमित शाहांच्या या एकाच वाक्यातून एकनाथ शिंदे, अजित पवारांना सूचक इशारा दिला आहे. त्याचमुळे राज्यातील सत्तेसह आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचीही धास्ती त्यांना लागून राहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT