Ravindra chavan, Narendra Modi, devendra fadanvis Sarkarnama
विश्लेषण

BJP News : कोकणातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठरणार का तारणहार?

Mahayuti victory in Konkan : भाजपचे प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांना मिळणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, शिर्डी येथील अधिवेशनावेळी महाराष्ट्र शाखेच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करीत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला.

Sachin Waghmare

Bjp News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांचे विश्वासू सहकारी रवींद्र चव्हाण यांच्या वाट्याला चांगले खाते येईल, अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र, मंत्रीमंडळ विस्तारावेळी वेगळेच घडले. चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. तर दुसरीकडे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे रिक्त झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांना मिळणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, शिर्डी येथील अधिवेशनावेळी महाराष्ट्र शाखेच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करीत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची ओळख आहे. माजी मंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे येत्या काळात मोठी संघटनात्मक जबाबदारी असणार आहे. त्याच मुळे महाराष्ट्र शाखेच्या कार्याध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांची ओळख सामान्य कार्यकर्ता म्हणून 25 वर्षांपूर्वी त्यांनी राजकीय क्षेत्रात कामाला सुरवात केली. पुढे भाजपचा समर्पित कार्यकर्ता ते बड्या नेत्यांचा निकटचा कार्यकर्ता, असा प्रवास करत ते भाजप नेत्यांच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखले जाऊ लागले.

डोंबिवली हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे एक महत्वाचे ठिकाण मानले जाते. याठिकाणी उच्चशिक्षित आणि कट्टर संघ कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. अशा वातावरणात रवींद्र चव्हाण यांना संघ आणि भाजपच्या वर्तुळात प्रवेश मिळवणे कठीण होते. मात्र, अतिशय धोरणी राजकीय वाटचाल करत, त्यांनी थेट पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर पकड मिळवली आहे. त्यामुळे आता येत्या काळात तेच चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतील असे मानले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिले नव्हते. त्याचा फटका त्यांना विदर्भात बसला होता. राज्यातील सत्तेचे समीकरण बदलल्यानंतर विदर्भातील मतदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले होते. अखेर त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी नियुक्ती करण्याची चर्चा सुरू असताना रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे आले होते. ज्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे.

रवींद्र चव्हाण यांची संघटनेतील वातावरणाची संपूर्ण माहीत असल्याने कामगिरी दमदार राहिली आहे. विशेषता मराठा चेहरा ते डोंबवली शहरासोबतच संपूर्ण कोकणाची माहिती त्यांना आहे. या त्यांच्याकडील जमेच्या बाजू लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांच्यावर विश्वास दाखवत रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे त्यांनी ही मंत्रीपदापेक्षा संघटनेची ताकद वाढविण्यावर भर देण्याचे मनोमनी ठरवले आहे. त्यामुळे येत्या काळात संघटनेला मोठे बळ मिळणार आहे.

रवींद्र चव्हाण यांनी राज्यात युतीचे सरकार असताना 2017 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक शिवसेना भाजप आमनेसामने आले होते. त्यावेळी डोंबिवली निवडणूक भाजपने लढवली आणि शिवसेनेचा पराभव करून महापालिका निवडणूक जिंकली. रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीचे नेतृत्व केले होते.

याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचे मानले जात होते. मात्र, चव्हाण यांनी त्यांच्याकडे जबाबदारी घेत शिवसेनेचा मतदारसंघ खेचून विजय मिळवला. रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाची जबाबदारी घेऊन काम केले. त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या फरकाने विजयी केले. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत ठाण्यासह कोकणात त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले.

त्यामुळेच त्यांच्यावर भाजपने आता येत्या काळात मोठी जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे काही दिवसात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच त्यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे. विशेषता म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कोकणात त्यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे.

या ठिकाणी महायुतीने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच भाजपला या ठिकाणी मोठे यश मिळाले आहे. भाजप या ठिकाणी पुनरागमन करताना दिसत आहे. त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांच्यावरील जबाबदारी कोकणासोबतच आता संपूर्ण राज्यभराची असणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लागले लक्ष लागले आहे.

विशेषता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या कामगिरीप्रमाणेच ते आपल्या कामाने संघटनेतील जबाबदारी समर्थपणे संभाळतील अशीच सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीचे फलित भाजपला येत्या काळात मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळेच कोकणातील महायुतीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा नेताच येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसाठी तारणहार ठरणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT