Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टने दिले आहेत. त्यानंतरच्या काळात राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. एकीकडे उद्धव- राज ठाकरे या बंधूंच्या एकत्र येण्याचा चर्चा रंगल्या आहेत.
येत्या काळात जर उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे हे दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. या संभाव्य युतीचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मराठी मतदारांचे एकत्रीकरण, हिंदू मतांचे आकर्षण आणि विरोधी पक्षांची रणनीती या सर्व घटकांवर या युतीचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे येत्या काळात काय होणार? याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येतील अथवा येणार नाहीत, या विषयी काहीही मत व्यक्त करणे घाईचे ठरणार आहे. गेल्या तीन वर्षात राज्याचे राजकारण खूप बदलले आहे. गेल्या पाच वर्षात पाहिले तर 2019 च्या निकालानंतर शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर सारले. हे कधीच होणार नाही, असे सांगणारे विश्लेषक या प्रकारामुळे तोंडघशी पडले.
त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन भाजपसोबत (Bjp) गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर अजित पवार 40 आमदार घेऊन महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे येत्या काळात अशक्य अशी कुठलीच शक्यता राहिली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात रंगली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. याची सुरुवात डोंबिवलीतून होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते याबद्दल चर्चा करत आहेत. तसेच, दोन्ही पक्ष लवकरच एका आंदोलनात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी ही घटना महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे बंधूंच्या या संभाव्य युतीचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मराठी मतदारांचे एकत्रीकरण, हिंदू मतांचे आकर्षण, आणि विरोधी पक्षांची रणनीती या सर्व घटकांवर या युतीचा प्रभाव पडू शकतो. त्यासोबतच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांच्या भूमिकाही या नव्या समीकरणांमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत भाष्य केले होते. या गोष्टीला उद्धव ठाकरेंनीही ग्रीन सिग्नल दाखवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, "युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली गेली आहे. महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात भावना असेल, तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, अशी भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे." याचा अर्थ, युतीबाबत राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रयोगासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. जनतेची इच्छा असल्यास, हा प्रयोग करायला हरकत नाही, असे उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेबाबत सर्वानाच उत्सुकता लागली आहे.
एकंदरीतच पहिले तर ठाकरे बंधूंच्या या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. या युतीच्या यशस्वीतेवर आगामी निवडणुकांमध्ये मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्यावर बरेच गणिते अवलंबून असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.