Uddhav thackeray, Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : 'वक्फ'चा पहिला फटका महाविकास आघाडीला; उद्धव ठाकरे सोडणार काँग्रेसची साथ?

MVA News : आतापर्यंत वक्फ संशोधन विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची साथ सोडली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai Political News : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असेलल्या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पूर्णपणे पाठिंबा दिला होता. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी देखील राहिली होती. त्यांची आतापर्यंतची भूमिका पाहता त्यांनी काँग्रेससोबत सर्वच मुद्द्यावरून जुळवून घेतले होते.

त्यामुळे उद्धव ठाकरे वक्फ विधयेकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसप्रमाणे कोर्टात जातील, असे सर्वाना वाटत होते. मात्र, आतापर्यंत वक्फ संशोधन विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

एकीकडे काँग्रेससह (Congress) इंडियाचे आघाडीतील काही मित्र पक्षाने वक्फ संशोधन विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने न्यायालयात जाण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे आता विरोधकाच्या राज्यातील महाविकास आघाडीमधील तीन पक्ष एकत्रित नाहीत का? अशी चर्चा रंगली आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आप, कॉंग्रेस व एमआयएमने या वक्फ विधयेकाला विरोध करीत कोर्टात जाणे पसंत केले आहे. मात्र, शिवसेनेने (Shivsena) मात्र वक्फ विधेयकाविषयीची भूमिका दोन्ही सभागृहात मांडली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार ? याची उत्सुकता लागली आहे.

वक्फ संशोधन विधेयकावर गेली दोन दिवस लोकसभा व राज्यसभेत वादळी चर्चा झाली. त्यानंतर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाली. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यानंतर या विधयेकावरून साइड इफेक्ट जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.

एकीकडे काँग्रेससह इंडियाचे आघाडीतील काही मित्र पक्षाने वक्फ संशोधन विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने न्यायालयात जाण्यास नकार दर्शवत या मुद्द्यावरून काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे आता विरोधकाच्या राज्यातील महाविकास आघाडीमधील तीन पक्ष एकत्रित नाहीत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वक्फ संशोधन विधेयकावर गेली दोन दिवस लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता कायदा झाला आहे. त्यानंतरही या विधयेकावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्याबाबत ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स या स्वयंसेवी संस्थेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याआधी काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मात्र, याबाबत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल तर ते जाऊ शकतात. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जस-जशी वेळ येईल तेव्हा तेव्हा बोलता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करीत कोर्टात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याशिवाय उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच भाजपच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आहे. ‘ऑर्गनायजर’ मधील एका लेखात वक्फनंतर कॅथोलिक चर्च आणि त्यांच्या संस्थांकडे असणाऱ्या सात कोटी हेक्टर जमिनीकडे वेधले आहे. वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली असल्याचे स्पष्ट करीत उद्धव ठाकरे यांनी या बिलाबाबत भाजपला हिंदूंचे काही घेणे देणे नाही. त्याचा छुपा अजेंडा ऑर्गनायजरने उघड केला आहे.

भाजप ख्रिश्चिन समाजाकडे असणाऱ्या जमीन घेणार असल्याचा आरोप यावेळी केला. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT