Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chandrakant Khaire, Sandipan Bhumresarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Constituency : होऊ द्या खर्च.. भुमरे-खैरेंनी केला सर्वाधिक खर्च...

Sandipan Bhumre महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी सर्वात जास्त म्हणजे 17 लाख 79 हजार 241 रुपये खर्च केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 11 रोजी सायंकाळी संभाजीनगर, जालना आणि बीड या मराठवाड्यातील तीन मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. संभाजीनगरमध्ये महायुतीचे संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे म्हणजेच दोन शिवसैनिकांत टक्कर होणार आहे.

विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचे या दोघांना मोठे आव्हान असणार आहे. निवडणूक म्हणजे खर्च आलाच, पण या खर्चा हिशोब निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला सादर करावा लागतो. मंगळवारी निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनूसार संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी आतापर्यंत सर्वाधिक खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते. या खर्चाची आयोगाकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी केलेल्या खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील तपासणी मंगळवारी (ता.7) करण्यात आली. यात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी सर्वात जास्त म्हणजे 17 लाख 79 हजार 241 रुपये खर्च केले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांनी 7 लाख 18 हजार 726 रुपये खर्च केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Sandipan Bhumre News : '...त्यामुळे मी खासदार होणारच' ; संदीपान भुमेरेंचा विश्वास!

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 25 एप्रिलपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारांनी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीपासून 6 मे पर्यंत केलेल्या खर्चाचा हिशेब मंगळवारी खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्याकडे सादर करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी 6 लाख 6 हजार 56 रुपये, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी 5 लाख 95 हजार 130, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत यांनी 3 लाख 34 हजार 885, अपक्ष जे.के. जाधव यांनी 5 लाख 74 हजार 510 तर हर्षवर्धन जाधव यांनी फक्त 2 लाख 87 हजार 711 एवढा खर्च केल्याचे नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar Constituency : ...म्हणून आता छत्रपती संभाजीनगरमधून उच्चशिक्षित खासदार निवडा!

यानंतर ११ मे रोजी उमेदवारांना खर्च सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आता मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने त्या त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, रॅली, मेळावे होणार आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात प्रमुख उमेदवारांच्या खर्चाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : 'अब की बार चारशे पार'मध्ये भुमरेंचा नंबर लावण्यासाठी भाजपने कसली कंबर ..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com