जोतिरादित्य शिंदेंचं अजब कृत्य; आपल्या तोंडावरील मास्क काढून लावला दुसऱ्याला!

जोतिरादित्य शिंदे हे एका नव्या वादात सापडले आहेत. त्यांनी त्यांच्या तोंडावरील मास्क काढून दुसऱ्या व्यक्तीला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya Scindia
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला होता. यात मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवणारे जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले. आता शिंदे एका नव्या वादात सापडले आहेत. त्यांनी त्यांच्या तोंडावरील मास्क काढून दुसऱ्या व्यक्तीला लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

जोतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शिंदे हे लोकांच्या गर्दीत उभे आहेत. ते त्यांच्या तोंडावरील मास्क काढून दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडाला लावताना दिसत आहेत. गर्दीत तोंडावरील मास्क उतरवणे चुकीचे आहे. आपण वापरत असलेला मास्क दुसऱ्या व्यक्तीला वापरायला देणे हे अतिशय गंभीर आहे. शिंदेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. शिंदे यांनी मास्क वापरायला दिलेले व्यक्ती दुसरेतिसरे कुणी नसून, ग्वाल्हेरचे माजी खासदार अरुण मिश्रा आहेत.

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2009 ते 2012 मध्ये शिंदे हे केंद्रात वाणिज्य व उद्योग मंत्री होते. नंतर 2012 ते 2014 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होते. काँग्रेसच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. नंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

Jyotiraditya Scindia
मोदी-शहांनी गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिलं मोठं टार्गेट

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे असून, महाराष्ट्रातील नारायण राणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. नव्या मंत्रिमंडळात 70 मंत्री (90 टक्के) करोडपती आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे आहेत. त्यांची संपत्ती 379 कोटी रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com