PNB Scam: मोठी बातमी! नीरव मोदीच्या PNB घोटाळा संबंधित प्रकरणात भ्रष्टाचार नाही! CBIला मिळाले नाहीत पुरावे

PNB Scam: देशाला हादरवून सोडणाऱ्या पंजाब नॅशन बँक (PNB) संबंधित घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या भारतातून फरार झाला असून लंडनमध्ये वास्तव्याला आहे.
PNB Scam_Nirav Modi
PNB Scam_Nirav Modi
Published on
Updated on

PNB Scam: देशाला हादरवून सोडणाऱ्या पंजाब नॅशन बँक (PNB) संबंधित घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या भारतातून फरार झाला असून लंडनमध्ये वास्तव्याला आहे. युकेमधल्या एका तुरुंगात सध्या त्याला ठेवण्यात आलं असून त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरु आहेत. त्यातच आता त्याच्या या घोटाळ्यासंबंधी महत्वाची बातमी समोर आली आहे. या घोटाळ्यात पीएनबीच्या कर्मचाऱ्यांकडून कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, कारण यासंदर्भातील कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत असं सीबीआयनं म्हटलं आहे. त्यामुळं हा खटला आता विशेष सीबीआय कोर्टाकडं हस्तांतरीत करण्यात आला आहे.

PNB Scam_Nirav Modi
Supriya Sule: काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, मला अन् शरद पवारांना...

पीएनबी घोटाळ्यांपैकी ३२१ कोटी रुपयांचा हा घोटाळा असून मुंबईतील पीएनबीच्या झोनल कार्यालयाकडून याप्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. बँकेनं आरोप केला होता की, नीरव मोदीच्या कंपन्यांना देण्यात आलेल्या क्रेडिट सुविधांचा दुरुपयोग करुन बँकेसोबत ३२१.८८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणावर विशेष सीबीआय कोर्टात न्यायमूर्ती जीपी दरेकर यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सीबीआयचे सरकारी वकील विक्रम सिंह यांनी कोर्टाला सांगितलं की, चौकशी दरम्यान पीएनबीच्या अधिकाऱ्यांविरोधात किंवा खासगी व्यक्तीविरोधात भ्रष्टाचार निर्मुलन अधिनियमानुसार कोणतीही भ्रष्टाचारासंबंधीची माहिती किंवा ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

कारण सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचा खटला होत नाही, त्यामुळं त्यामुळं सीबीआय आता अंतिम चार्जशीट केवळ खासगी व्यक्तींविरोधातच दाखल करेल. या तांत्रिक बदलामुळं हे प्रकरण विशेष सीबीआय कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर गेलं आहे. त्यानंतर कोर्टानं सीबीआयची ही याचिका स्विकारत या खटल्याला अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाकडं हस्तांतरीत केला आहे. या ठिकाणी आता केवळ भारतीय न्याय संहितेंर्गत कलमांनुसार खटला दाखल केला जाईल.

PNB Scam_Nirav Modi
Sangli-Satara MLC : शिंदे-देसाई यांच्यात बंदखोलीत तासभर चर्चा; भाजपकडून डावलले जात असल्याने शिवसेना-राष्ट्रवादी नाराज

कोणत्या कंपन्यांमध्ये झाली होती देवाणघेवाण

पीएनबीच्या अंतर्गत चौकशी अहवालानुसार, नीरव मोदीच्या नियंत्रणातील विविध सहकारी कंपन्यांमध्ये पैसा खेळवण्यासाठी सर्क्युलर ट्रान्झॅक्शन करण्यात येत होते. या फसवणुकीत नीरव मोदीच्या अनेक कंपन्यांचा समावेश होता. यामध्ये सोलर एक्सपोर्ट्स, स्टेलर डायमंड आणि डायमंड आर युएस यांचाही समावेश होता. याशिवाय फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचाही समावेश होता.

या प्रकरणात नीरव मोदीशिवाय फायरस्टारचे माजी फायनान्स चीफ विपुल अंबानी आणि चीफ फायनान्स ऑफिसर रविशंकर गुप्ता यांच्यासह अनेक इतर संचालकांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे.

PNB Scam_Nirav Modi
India Global Financial Hub : जगातील पहिल्या वित्तीय सेवा देणाऱ्या बाजारपेठा, मुंबई कितव्या स्थानावर.....

मुख्य घोटाळ्यापेक्षा वेगळं प्रकरण

दरम्यान, ३२१.८८ कोटी रुपयांचा हा घोटाळा नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी केलेल्या १३,००० कोटी रुपयांच्या मुख्य घोटाळ्याच्या व्यतिरिक्तचा दुसरा घोटाळा आहे. या मुख्य घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी दोन्हींकडून सुरु आहे. या प्रकरणात मात्र मुंबईच्या ब्रेडी हाऊस शाखेच्या बँक अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. नीरव मोदी हा सध्या लंडनच्या वांड्सवर्थ तुरुंगात कैदेत असून भारत सरकारकडून सातत्यानं त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com