IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील भेसळखोरांना 'मुंढे पॅटर्न'चा दणका : आता देशभर धाडसत्रांची तयारी, बड्या IAS अधिकाऱ्यांचा थेट संपर्क

IAS Tukaram Mundhe News : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी कारवायांची देशभर चर्चा आहे. तेलंगणा आणि कर्नाटकसारखी राज्येही 'मुंढे पॅटर्न' अभ्यासून तत्सम मोहीम राबवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे
FDA Commissioner Tukaram Mundhe's anti-adulteration campaign in Maharashtra is gaining nationwide attention, with Telangana and Karnataka reportedly exploring a similar enforcement model.
FDA Commissioner Tukaram Mundhe's anti-adulteration campaign in Maharashtra is gaining nationwide attention, with Telangana and Karnataka reportedly exploring a similar enforcement model.Sarkarnama
Published on
Updated on

IAS Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्समधील पदार्थ, दूध, पनीरपासून ते सौंदर्य प्रसाधनापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतील भेसळखोरीचा पर्दाफाश करण्याचा धडाका लावला आहे. त्यांच्या या धाड सत्रांची आणि कारवायांची महाराष्ट्रासह देशभरात जोरदार चर्चा आहे.

कारवाईचा हाच 'मुंढे पॅटर्न' देशभरातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरत आहे. आता तेलंगणा, कर्नाटकसारख्या राज्यांचा 'मुंढे पॅटर्न' राबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील काही एफडीए अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंशी संपर्क साधल्याची माहिती आहे.

बदली कुठल्याही विभागात झाली तरी सामान्य माणसांच्या प्रगतीसाठी काम करण्याचा तुकाराम मुंढे यांचा प्रयत्न असतो. दोन महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली. तेव्हापासून राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात धाड सत्र सुरु झाले आहे.

भेसळखोर, गुटखा वाहतूक यांच्यावर थेट मकोका लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे भेसळ करणारे आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामागे आयुक्त तुकाराम मुंढे यांचीच कडक आदेश असल्याचे बोलले जाते.

FDA Commissioner Tukaram Mundhe's anti-adulteration campaign in Maharashtra is gaining nationwide attention, with Telangana and Karnataka reportedly exploring a similar enforcement model.
Tukaram Mundhe : दूध भेसळीच्या हॉटस्पॉटवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक : आठवड्याभरातच उद्ध्वस्त केलं आणखी एक रॅकेट

तुकाराम मुंढे यांचा पॅटर्न आता देशभरात राबवला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 'मुंढे पॅटर्न'ची माहिती घेण्यासाठी इतर राज्यांच्या एफडीए आयुक्तांनी आणि बड्या आयएएस अधिकाऱ्यांनी थेट मुंढे यांच्याशीच संपर्क साधल्याची माहिती आहे.

FDA Commissioner Tukaram Mundhe's anti-adulteration campaign in Maharashtra is gaining nationwide attention, with Telangana and Karnataka reportedly exploring a similar enforcement model.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडे आता चंदेरी दुनियेची धाव : थर्ड क्लास जेवणावर FDA अधिकाऱ्यांच्या धाडी पडणार?

आपल्या राज्यातही अन्न आणि औषध विभागाचा कारभार पारदर्शक आणि कडक करण्यासाठी काय करता येऊ शकते? त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्येही पुढील काळात असे धाड सत्र पाहायला मिळू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com